जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ऑनलाईन क्लास सुरू असताना अचानक एका प्राध्यापिकेची तब्येत बिघडली आणि कोरोनामुळे विद्यार्थ्यांसमोरच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पाओला डी सिमोने असं त्या प्राध्यापिकेचं नाव असून त्या 46 वर्षांच्या होत्या. लोकप्रिय व्हिडीओ मीटिंग App झूमवरून प्राध्यापिका विद्यार्थ्यांना शिकवत असत. क्लास घेत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना त्रास सुरू झाला आणि विद्यार्थ्यांसमोरच त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
पाओला डी सिमोने यांना काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण झाली होती. मात्र तरी देखील त्या आपल्या घरातून विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लास घेत होत्या. विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांना श्वास घेण्यासाठी खूपच त्रास होऊ लागला. प्राध्यापकीची अशा अवस्था पाहून विद्यार्थ्यांनी रुग्णवाहिका पाठवण्यासाठी त्यांना घराचा पत्ता विचारला. मात्र त्या सांगू शकत नव्हत्या. त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांसमोरच झाला प्राध्यापिकेचा मृत्यू
पाओला आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवत होत्या. 4 आठवड्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एका प्रोफेसरनी ट्विटरवरून दिली आहे. कोरोनामुळे त्रास होत असताना देखील त्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाने सर्वच देशांत थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला
बापरे! रेल्वे स्थानकाजवळ भीषण स्फोट, 35 फूट उंच उडाले दगड; थरकाप उडवणारा Video
"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
"गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या", अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
विकृतीचा कळस! 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या, 20 दिवसांतील तिसरी घटना
बापरे! मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजण्याची कुटुंबीयांवर आली वेळ