वॉशिंग्टन : चीनमध्ये कोरोना व्हायरसने किती बळी घेतले? जे आकडे ड्रॅगन देत आहे, त्यावर जग विश्वास ठेवायला तयार नाही. एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे, की चीनने वुहानमधील मृतांचा आकडा तब्बल 10 पट कमी करून सांगितला आहे. चीनने वुहानमधील मृतांचा आकडा 2,524 एवढा सांगितला आहे. मात्र, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आणि ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या आभ्यासात म्हणण्यात आले आहे, की वुहानमध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान तब्बल 36,000 जणांचा मृत्यू झाला. हा अभ्यास वुहानच्या स्मशांमधील डेटावर आधारलेला आहे.
या अभ्यासात सांगण्यात आले आहे, की जानेवारी ते मार्चपर्यंत वुहानमधील स्मशानांत 24 तास अंतिमसंस्कार सुरू होते. हा अभ्यास medRxivवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच याचा पीअर रिव्ह्यू झालेला नाही.
CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार
चीनने सांगितल्यानुसार, वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सापडला. मात्र, त्यापूर्वी डिसेंबर 2019मध्येच चीनी मेडिकल फोरम्सवर निमोनिया सारख्या आजाराची चर्चा सुरू झाली होती. जानेवारी संपता-संपताच वुहानमधील रुग्णालयांची कंबर तुटली होती. त्यांच्याकडे 90 हजार बेड होते. होटेल्स आणि शाळांमध्ये एक लाख बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र तेव्हा चीनचा अधिकृच आकडा केवळ 33,000 एवढाच होता. 23 मार्चपर्यंत, चीनने इतर ठिकाणांवरून वुहानला तब्बल 42,600 डॉक्टर्स आणि हेल्थवर्कर्स पाठवले. तर तेथे 90 हजार आधीपासूनच उपस्थित होते. मात्र, 23 मार्चपर्यंत चीनने केवळ 50 हजारच कोरोनाबाधित असल्याचे सांगितले.
थरकाप उडवणारे चित्र -या दोन्ही विद्यापीठांनी वुहानमधील आठ स्मशानांचा डेटा एकत्र केला आहे. त्यांच्या मते, 25 जानेवारीपर्यंत या स्मशानांत 24 तास अंत्यसंस्कार सुरू होते. संपूर्ण डेटाच्या आधारे अभ्यासकांनी सांगितले, की वुहानमध्ये चीनच्या आधिकृत आकड्यांपेक्षाही 10 पट रुग्ण समोर आले होते. सर्वसाधारणपणे वुहानमधील स्मशानं केवळ चार तासच खुली राहतात. 90 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात सर्वसाधारणपणे रोज 136 अंत्यसंस्कार होतात. मात्र तेथे ज्या वेगाने अंत्यसंस्कार होत होते, त्या अनुशंगाने तेथे दिवसाला 816 रुग्णांवर उपचार होत होते. याशिवाय मोबाईल स्मशान वेगळे होते. अभ्यासानुसार अनेकदा वुहानमध्ये रोज 2100 मृत्यूही झाले आहेत.
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही
'चीनने खेळला आकड्यांचा मोठा खेळ' -अभ्यासकांनी येथील अस्थी कलशांचा डेटाही एकत्र केला आहे. यानुसार, जानेवारी ते मार्चदरम्यान जवळपास 36,000 अस्थी कलश विकले गेले. अभ्यासात म्हटले आहे, की सर्व सोर्सेसकडून डेटा मिळवल्यानंतर समोर आले आहे, की वुहानमध्ये 23 मार्चपर्यंत तब्बल 36 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. हा आकडा चीनने जाहीर केलेल्या 2,524पेक्षा 10 पट अधिक आहे. चीनमध्ये 7 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचे तब्बल 3,05,000 ते 12 लाख रुग्ण होते. या वेळेपर्यंत 6,800-7,200 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, चीनने 7 फेब्रुवारीपर्यंत केवळ 13,600 रुग्ण आणि 545 मृत्यू सांगितले होते.
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...