शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
4
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
5
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
6
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
7
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
8
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
9
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
10
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
13
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
14
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
15
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
16
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
17
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
18
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
19
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
20
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 9:51 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या या लढ्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील सर्वच देश या संकटाचा सामना करत असून कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 16,643,498 वर गेली असून 656,621 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 10,231,837 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश देखील आले आहे.

कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या या लढ्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांना कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडल्याची माहिती मिळत आहे. ही औषधं कोरोना व्हायरसचा प्रसार रोखू शकतात. सॅनफोर्ड बर्नहम प्रीबायस मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे. 

शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन कोरोनाच्या उपचारात मदत करू शकते. कोरोना व्हायरसची प्रतिकृती रोखण्यासाठी औषधांचे विश्लेषण केले गेले. लॅब टेस्टमध्ये अँटीव्हायरल अ‍ॅक्टिव्हिटी असलेले 100 रेणू (molecules) आढळले. हा अभ्यास नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, ही औषधे रुग्णांसाठी सुरक्षित आहेत. तसेच यापैकी चार कंपाऊंड हे रेमडेसिवीरसोबत एकत्रित करून कोरोनाच्या उपचारासाठी वापरली जाऊ शकतात.

सॅनफोर्ड बर्नहम प्रीबायसमधील रोग प्रतिकारशक्ती कार्यक्रमाचे संचालक सुमित चंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रेमडेसिवीर औषध रुग्णालयात रूग्णांचा रिकव्हरी वेळ कमी करण्यास सक्षम आहे, मात्र हे औषध सर्व लोकांवर सारखा परिणाम दाखवत नाही". तसेच अद्यापही स्वस्त, प्रभावी आणि सहज उपलब्ध होणारी औषधं शोधली जात आहेत जी रेमेडेसिवीरसारखचं काम करू शकतात असं देखील त्यांनी म्हटलं आहे. शास्त्रज्ञांनी या अभ्यासात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या फुफ्फुसांच्या बायोप्सिसवरील औषधांच्या परिणामाची देखील तपासणी केली. 

शास्त्रज्ञांनी 21 औषधांमधून कोरोनाती प्रतिकृती होण्यापासून रोखणारी 13 औषधे क्लिनिकल ट्रायलमध्ये असल्याचं म्हटलं आहे. तसेच COVID-19 रूग्णांवर उपचार करण्यास ते प्रभावी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. यापैकी 2 जणांना यापूर्वीच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मान्यता दिली आहे. ही औषधे एस्टेमिझोल (Astemizole) आणि क्लोफाझॅमिन (Clofazamine) आहेत, तर आपत्कालीन परिस्थितीत रेमडेसिवीर वापरण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

शास्त्रज्ञांनी सध्या या 21 औषधांची चाचणी ही छोट्या प्राण्यांवर केली जात असल्याचं म्हटलं आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली तर कोरोनावरील उपचारासाठी देखील वापरण्याची परवानगी मागितली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटींवर पोहचली असून तब्बल सहा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक

CoronaVirus News : लढ्याला यश! फक्त 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट, एका तासात येणार रिपोर्ट

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं

काय सांगता? कोरोनाला दूर ठेवणारा Sanitizer Pen आला, लिहिताना हातही होणार स्वच्छ

CoronaVirus News : "Covid रिपोर्टिंगमध्ये उत्तर प्रदेश, बिहारची कामगिरी सर्वात वाईट"; रिपोर्टमधून खुलासा

CoronaVirus News : लय भारी! PPE किट घालून पाहुण्यांना वाढलं जेवण; अनोख्या लग्नाचा Video तुफान व्हायरल

रुग्णालयातील धक्कादायक वास्तव! नवजात बाळ ट्रेमध्ये, ऑक्सिजन सिलेंडर खांद्यावर अन् 'ते' शोधत होते डॉक्टर पण...

CoronaVirus News : हँड सॅनिटायझरचा जास्त वापर करता?; वेळीच व्हा सावध, आरोग्य मंत्रालयाने दिला मोलाचा सल्ला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूmedicinesऔषधं