मॉस्को - कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याच्या बाबतीत रशिया सर्वांच्या पुढे आहे. एवढेच नाही, तर वैज्ञानिकांच्या एका चमूने हाही दावा केला आहे, की रशियाने कोरोना लसीची मानवी चाचणी पूर्ण केली आहे. यानंतर रशियातील अनेक उद्योगपती आणि बड्या राजकारणी मंडळींना आधीच कोरोनाविरोधातील प्रायोगिक लस देण्यात आली आहे. यासंदर्भात एक रिपोर्टदेखील समोर आला आहे.
यासंदर्भातील ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, रशियातील अनेक व्यापाऱ्यांना आणि राजकीय मंडळींना कोरोना व्हायरसवरील प्रायोगिक लस एप्रिल महिन्यातच देण्यात आली आहे. ज्या मंडळींना ही लस देण्यात आली. त्यांत अॅल्युमिनिअम जायंट कंपनी युनायटेड रसेलचे वरिष्ठ अधिकारी, अब्जाधीश आणि सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ही लस मॉस्को येथील गमलेया या सरकारी इंस्टीट्यूटने एप्रिल महिन्यातच तयार केली आहे, असे काहींनी सांगितले. मात्र, ही माहिती सार्वजनिक नसल्याने त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
मिळालेल्या माहितीनुसार गमलेईला लसीसाठी सरकारी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेन्ट फंड आणि डिफेन्स मिनिस्ट्रीची मदत मिळाली आहे. या लसीची पहिली चाचणी गेल्या आठवड्यातच पूर्ण झाली आहे. ही चाचणी रशियन सैनिकांवर करण्यात आली होती. यात 40 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. मात्र या चाचणीचा निकाल सार्वजनिक करणअयात आला नाही. पण आता एका मोठ्या समूहावर या लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे.
क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेसकोव नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना मे महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी सांगितले, की इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस कुणी कुणी घेतली त्या प्रत्येकाची नावं त्यांना माहित नाहीत.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही ही लस घेतली होती का?, असा प्रश्न विचारला असता, देशाच्या प्रमुखाला अशी प्रमाणित नसलेली लस देणं योग्य नसल्याचं पेसकोव यांनी स्पष्ट केलं.
सप्टेंबरपासून उत्पादन सुरू -गमलेई इन्स्टिट्यूटचे प्रमूख अलेक्झॅन्डर झिंट्सबर्ग यांच्यामते ही लस 12 ते 14 ऑगस्टमध्ये तयार होईल आणि खासगी कंपन्या सप्टेंबर महिन्यापासून याच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला सुरूवात करतील. गमलेई इन्स्टिट्यूनुसार, ही लस मानवी चाचणीमध्ये पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?
पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!
बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप