शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

चीनपासून वेगळं असल्याचे सिद्ध करा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला 30 दिवसांचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:45 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली व तेथील एका अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच चीनने धमक्या दिल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना संर्दभातली माहिती लपवून ठेवल्याचा धक्कादायक आरोप अमेरिकेने केला आहे. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेला करण्यात येणारी मदतही रोखण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रोस अ‍ॅडॅनॉम यांना पत्र लिहून धोरणं सुधारण्याची विनंती केली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून  कोरोनाबाबात वारंवार दुर्लक्ष करण्यात आलं असल्याचा आरोप देखील त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. 

येत्या 30 दिवसांत चीनपासून वेगळं असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने हे सिद्ध न केल्यास  जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणारा निधी कायमचा रोखण्यात येईल असा इशारा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटाना चीन केंद्रित काम करत असल्याचा आरोप केला होता. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणारा निधी रोखण्याचा निर्णय देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता.

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच सीआयएने दावा केला आहे की, चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची माहिती कशी लपवली आणि दोघांनी नक्की कोणत्या प्रकारची योजना आखली होती यासंर्दभातील सर्व पुरावे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जर कोरोनाची माहिती ताबडतोब जाहीर केली तर आम्ही कोरोना संक्रमणाच्या तपासणीत सामिल होणार नाही, अशी चीनने धमकी दिली होती. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत जगाला अलर्ट करण्यात उशिर केला असा आरोप अमेरिकेने केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाAmericaअमेरिकाchinaचीन