कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी बऱ्याच देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरी देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे.
वैद्यकिय कर्मचारी आणि डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. घरापासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना पीपीई किट देण्यात आले आहे. मात्र पीपीई किट घालून कित्येक तास काम करणं फार अवघड आहे. अशाच एका कोरोना योद्ध्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोरोना किट काढताना नर्स आणि डॉक्टरांची अवस्था नेमकी कशी असते हे दाखवण्यात आलं आहे.
कोरोनाच्या संकटात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे दिवस-रात्र काम करत आहेत. सतत मास्क घालून चेहऱ्यावर त्याच्या खुणा दिसून येत आहेत. तसेच पीपीई किटमध्ये अक्षरश: घामाच्या धारा येत असतात. शिफ्ट संपल्यावर एक डॉक्टर आपलं पीपीई काढतो तेव्हा घामामुळे त्यांची अवस्था नेमकी कशी होते हे व्हिडीओत दिसत आहे. पीपीई किटमध्ये कित्येक तासांची शिफ्ट केल्यानंतर साचून राहिलेला घाम पाहायला मिळत आहे.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील कोविड -19 रुग्णालयातील हा व्हिडीओ आहे. जिथे वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र रुग्णांवर उपचार करत आहेत. व्हिडीओमध्ये आपली शिफ्ट संपल्यानंतर, एक डॉक्टर आपलं पीपीई कीट काढतो तेव्हा घामाच्या धारा वाहतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या संकटात लढणाऱ्या या खऱ्या हिरोंना सर्वांनी सलाम केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनामुळे आतापर्यत सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आणखी एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. पाच महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. यामुळे चीनमध्ये ही घटना घडली असून आरोग्य यंत्रणा आणि डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका 68 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला होता. पण पाच महिन्यांनी पुन्हा एकदा महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याने चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : काय सांगता? कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेत
15 ऑगस्ट! पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून मागितली 'ही' गोष्ट, म्हणाले...
'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल
"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"
Video - "स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही"