नवी दिल्ली : एक चिमुकली आणि तिच्या वडिलांचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. ही चिमुकली केवळ 4 वर्षांची आहे. ती कॅन्सर पीडित आहे. मिला स्नेडन (Mila Sneddon) असे या चिमुकलीचे नाव. ती गेल्या 7 आठवड्यांपासून म्हणजेच जवळपास 50 दिवसांपासून आपल्या वडिलांपासून दूर होती. तिच्यावर केमोथेरपी सुरू होती. केमोथेरपी पूर्ण झाल्यानंतर ती आपल्या वडिलांना भेटली. वडील दिसताच तीने वडिलांना घट्ट मिठी मारली. हे संपूर्ण दृष्य, हृदयाला खोलवर स्पर्श करणारे आहे.
रेक्स चॅपमन यांनी या प्रसंगाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल 15 लाख हून अधिक लोकांनी पाहिला असून हृदय स्पर्शी आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच
ITVने दिलेल्या वृत्तानुसार, मिलाचे वडील स्कॉट यांनी तिला कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये, म्हणून दूर ठेवले. त्यांनी त्यांच्या मुलीला घराच्या एका वेगळ्या रूममध्ये ठेवले. ते तिला रोज केवळ काचेतूनच पाहत. काचेच्या दुसऱ्या बाजूकडूनच ते तिला पाहून हात हलवायचे आणि हसायचे. केवळ त्यांना एकदुसऱ्याची गळाभेट घेतायेत नव्हती.
आणखी वाचा - Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू
वडिलांनी लेकीला दिलं सरप्राइज -
जवळपास 50 दिवसांनंतर स्कॉट यांनी आपल्या लेकीला सरप्राइज दिले. ते अचानक खोलीत आले. चिमुकली काही वेळ तर केवळ वडिलांना पाहातच होती. मात्र, नंतर ती एकदम त्यांच्या कुशितच गेली आणि तिने त्यांना घट्ट आलिंगण दिले.
आणखी वाचा - 'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर
केमोथेरिपीमुळेच मिलाचे केस झडले आहेत. तिच्या इम्यून सिस्टिमवरीही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे घरच्यांचेही तिला भेटने अवघडच झाले आहे. सध्या स्कॉट घरीच आहेत. ते कामारवर जात नाहीयेत. यामुळेच ते मिलाला भेटू शकले.