इस्रायल (Israel) हा कोरोना व्हायरस लसीचा (Covid Vaccine) तिसरा डोस टोचणारा पहिला देश ठरला आहे. येथे सोमवारपासूनच वयस्क लोकांना फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech)च्या लसीचा तिसरा डोस टोचायला सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे (Delta Variant) रुग्ण वाढल्यानंतर सरकारने या लसीचा तिसरा डोस टोचण्याचा निर्णय घेतला आहे.
या लोकांना टोचला जाऊ शकतो लसीचा तिसरा डोस -न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे, की कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना तिसरा डोस टोचला जाऊ शकतो. याशिवाय हृदय, फुफ्फूस, कॅन्सर आणि किडनी ट्रान्सप्लांट केलेल्या लोकांना तिसरा डोस दिला जाऊ शकतो.
देशातील 'या' राज्यात कोरोना अन् झिकाचाही कहर! 17-18 जुलैला संपूर्ण लॉकडाउन; बँकाही राहणार बंद
इस्रायलमध्ये शेबा मेडिकल सेंटरचे तज्ज्ञ प्रो. गालिया रहव यांनी म्हटले आहे, ‘सध्य स्थितीत तिसरा डोस टोचण्याचा निर्णय योग्य आहे. आम्ही तिसऱ्या डोसच्या प्रभावासंदर्भात सातत्याने रिसर्च करत आहोत.’ एक महिन्यापूर्वी डेल्टा व्हेरिएंट रोज 10 पेक्षा कमी रुग्ण सापडत होते. आतापर्यंत ही संख्या 452 वर पोहोचली आहे. सध्या देशातील रुग्णालयांत कोरोनाच्या 81 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यांपैकी 58 टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
57.4% लोकांचे पूर्ण लसीकरण -अध्ययनातून समजते, की डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध कोरोना लस प्रभावी आहे. इस्रायलमध्ये लसीकरणाचा वेग चांगला राहिला आहे. एवढेच नाही, तर 57.4% नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे.
Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर सेक्सपासून 3 दिवस राहा दूर, डॉक्टरांचा सल्ला...!
लसीच्या या तिसऱ्या डोसमुळे कोरोनाच्या बिटा व्हेरिएंटविरुद्ध चांगली सुरक्षितता मिळेल अशी आशा आहे. बीटा व्हेरिएंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. हा व्हेरिएंट आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली व्हेरिएंट आहे. हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्रभावी आहे.