शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

CoronaVirus News: कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत २४ तासांत दीड लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

By कुणाल गवाणकर | Published: November 15, 2020 8:43 AM

CoronaVirus News: कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत भारत पहिल्या क्रमांकावर

वॉशिंग्टन: अमेरिकेत कोरोनानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेत दररोज कोरोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा थेट परिणा आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोनाचे १ लाख ५७ हजार रुग्ण आढळून आले. तर १ हजार २६० जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात सध्याच्या घडीला दररोज ४० ते ४५ हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या यादीत ब्राझील तिसऱ्या स्थानी आहे. ब्राझीलमध्ये काल दिवसभरात कोरोनाचे २९ हजार ४६३ कोरोना रुग्ण सापडले. तर ७२७ कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडले.आतापर्यंत सुरक्षित असलेल्या पृथ्वीवरील या भागांत कोरोनाचा शिरकाव, संसर्गाची भीती वाढलीअमेरिकेतील कोरोना रुग्णांचा आकडा १५ नोव्हेंबरला १ कोटी १२ लाख २६ हजारांवर पोहोचला. यापैकी २ लाख ५१ हजार २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या ८८ लाखांहून अधिक आहे. यातील १ लाख २९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ५८ लाख ४८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.Pfizer ची कोरोना लस टोचल्यावर कसे वाटले? व्हॉलंटिअर म्हणाले "भयानक साईडइफेक्ट"अमेरिकेत आतापर्यंत ६८.९१ लाख जण कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र सध्याच्या घडीला उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४० लाखांपेक्षा अधिक आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या ८८ लाखांपैकी ८२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५ लाखांहून कमी आहे. ब्राझीलमध्ये सध्या ४ लाखांपेक्षा कमी जणांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ५३ लाखांजवळ पोहोचली आहे.सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत सध्या जगात दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. सर्वाधिक मृत्यूंच्या संख्येत देशाचा क्रमांक जगात तिसरा आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत देश चौथ्या स्थानी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या