वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेसारखा देश सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. जगातल्या इतिहासात आपली अर्थव्यवस्था सर्वोत्कृष्ट होती. पण कोरोनामुळे परिस्थिती बिघडली, कोरोना लशीचे दोन दशलक्षाहून अधिक डोस तयार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं आहे. एकदा लशीची सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यावर त्याची वाहतूक सुरू केली जाईल. आम्ही त्याचा पुरवठा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.या लशीसंदर्भात गुरुवारी आमची बैठक झाली, आम्ही एक उत्कृष्ट काम करीत आहोत. त्यामुळे आम्हाला काही अतिशय आश्चर्यकारक परिणाम मिळू शकतात. लशीवर बरीच प्रगती झाली आहे. आम्ही जगाबरोबर काम करत आहोत आणि आम्ही चीनबरोबरही काम करू. आम्ही सर्वांसोबत काम करू. पण जे घडले ते कधीच पुन्हा ठीक होऊ शकत नाही, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
हेही वाचा
गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल
Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी
पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार
...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख
Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा