काठमांडू: नवा नकाशा प्रसिद्ध करून भारताच्या अखत्यारित असलेल्या प्रदेशावर दावा केल्यानंतर आता नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. दक्षिण आशियातील अन्य देशांच्या तुलनेत नेपाळमधील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी आहे. मात्र भारतातून येणाऱ्या व्यक्ती पुरेशा तपासण्यांशिवाय नेपाळमध्ये प्रवेश करत असल्यानं कोरोनाचा फैलाव वेगानं होत असल्याचा आरोप ओली यांनी केला.नेपाळमध्ये आज कोरोनाचे ७२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा ६७५ वर जाऊन पोहोचला. याचं खापर नेपाळनं भारतातून येणाऱ्या व्यक्तींवर फोडलं आहे. नेपाळनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन दोन जूनपर्यंत वाढवला आहे. नेपाळमध्ये २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. नेपाळ सरकारनं सर्व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक १४ जूनपर्यंत बंद ठेवली आहे.भारतातून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोनाचा फैलाव वेगानं होण्याचा आरोप करणाऱ्या नेपाळनं गेल्याच आठवड्यात नवा नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशातून नेपाळनं लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरामधल्या एकूण ३९५ चौरस किलोमीटरच्या प्रदेशावर दावा सांगितला. हा संपूर्ण भाग भारतीय हद्दीत येतो. नेपाळच्या भू व्यवस्थापन आणि सुधारणा मंत्री पद्मा अरयाल यांनी सरकारच्या वतीनं नवा नकाशा प्रसिद्ध केला. लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी सोबतच गुंजी, नाभी आणि कुटी गावांवरही नेपाळनं दावा सांगितला. नेपाळनं नव्या नकाशात कालापानीतल्या ६० किलोमीटर भागावर दावा केला आहे. यासोबतच लिंपियाधुरामधल्या ३३५ किलोमीटर भागही नकाशात दाखवला आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेटनं नव्या नकाशाला मंजुरीदेखील दिली.'तो' भाग आमचाच! नेपाळकडून नवा नकाशा प्रसिद्ध; भारताच्या ३९५ चौरस किलोमीटर प्रदेशावर दावाठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या सोमय्यांवर आली 'ते' ट्विट डिलीट करायची वेळमी मंत्री असल्यानं नियमाला अपवाद; मोदींच्या सहकाऱ्याचा क्वारंटिनला नकार
Coronavirus News: नेपाळची हिंमत वाढली?; कोरोनाच्या फैलावावरून भारतावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 7:40 PM