काठमांडू : जगभरातून कोरोनाचे (CoronaVirus) वेगवेगळे स्ट्रेन समोर येऊ लागले आहेत. काही स्ट्रेन हे वेगाने संक्रमण करणारे तर काही घातकी असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत ब्राझील, भारतीय कोरोना व्हायरसच्या व्हेरिअंटची चर्चा होती. मात्र, जगभरातील वृत्तांनुसार नेपाळमध्ये नवीन कोरोना व्हेरिअंट मिळाला असून तो युरोपपर्यंत (Europe) पसरला आहे. यावर डब्ल्यूएचओने नेपाळमध्ये SARS-CoV-2 च्या कोणता नवीन व्हेरिअंट आहे, याची माहिती मिळालेली नसल्याचे म्हटले आहे. (new corona virus variant from Nepal. WHO didnt know.)
Corona Lockdown: सावध व्हा! लॉकडाऊन संपल्यावर रिक्षा, टॅक्सी, बसमध्ये ही चूक करू नका; नाहीतर...
डेलीमेलच्या वृत्तानुसार गुरुवारी देशाच्या मंत्र्यांना अशा कोरोना स्ट्रेनबाबत अलर्ट करण्यात आले आहे, जो नेपाळमध्ये विकसित झाला आहे. हा व्हेरिअंट युरोपमध्येही पसरू लागल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोरोनावरील लसी या नव्या व्हेरिअंटसमोर फेल होत असल्याचे यात म्हटले आहे. नेपाळचा हा व्हेरिअंटमध्ये पोर्तुगालमध्ये सापडल्याचे यामध्ये म्हटले आहे. यामुळे युरोपमध्ये ऑगस्टपर्यंत सुट्यांवर परिणाम जाणवणार आहे.
या वृत्तामुळे जगभरात खळबळ उडालेली असताना WHO ने आपणही अनभिज्ञ असल्याचे सांगितले आहे. WHO ने केवळ तीन व्हेरिअंट असल्याचते म्हटले आहे. अल्फा (B.1.1.7), डेल्टा (B.1.617.2), कापा (B.1.617.1) आहेत. नेपाळमध्ये सध्या सर्वाधिक पसरणारा डेल्टा (B.1.617.2) व्हेरिअंट आहे. डब्ल्यूएचओचे विशेष दूताने सांगितले की, दर वेळी कोरोनाचा नवीन व्हेरिअंट मिळाला की आपण घाबरून जाता नये. व्हायरसमध्ये म्युटेशन होत राहतात आणि WHO त्या आधारे त्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवतो.
ITV वर डॉ. डेविड नबारो यांनी सांगितले की, कोरोनाचा कोणताही नवीन व्हेरिअंट येऊदे, त्याला रोखले पाहिजे. पसरू देता नये. कोरोनाचे नवे व्हायरस येत राहणार, काही चिंता वाढवतील. आपल्याला पुढे जावे लागले आणि जगावे लागेल.