नवी दिल्ली – गेल्या २ वर्षापासून जगात कोरोना महामारीमुळे अनेक देशांत चिंतेचे वातावरण पसरलं होतं. त्यात आता जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी जारी केली आहे. २१ मार्च ते २७ मार्च काळात कोरोना रुग्णांचे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी झाले आहे. परंतु मृतांचा आकडा ४३ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र त्यामागचं कारण वेगळं आहे. भारतात झालेल्या मृतांचा आकडा आता अपडेट केल्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढले आहे.
केरळमध्ये गेल्या २४ तासांत नोंदलेल्या १६ जुन्या मृत्यूंची भर पडली आहे, त्यामुळे मृत्यूंचा आलेख वाढला असून भारतात गेल्या २४ तासांत म्हणजेच २९ मार्च रोजी ३१ मृत्यूची नोंद झाली आहे, मात्र २४ तासांत १५ नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. त्याच वेळी, अमेरिका आणि चिलीमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृतांची संख्या आता वेगळ्या पद्धतीने मोजली जात आहे, ज्यामुळे तिथून मृत्यूची संख्या वाढत आहे.
जगातील कोरोना व्हायरसची सध्याची स्थिती
संपूर्ण जगात आतापर्यंत ४७ कोटी ९० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून ६० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या आठवड्यात कोरियामध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली, कोरियामध्ये २४ लाख ४२ हजारांहून अधिक नवीन रुग्णसंख्या नोंदवण्यात आली, तर जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे सुमारे १६ लाख रुग्ण नोंदवण्यात आली.
गेल्या आठवड्यात चिलीमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. अहवालानुसार, चिलीमध्ये ११ हजार ८५८ मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच अमेरिकेत ५ हजार ३६७ मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक मृत्यूंची नोंद असलेल्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर होता, तेथे ४ हजार ५२५ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे, कोरोना विषाणू वेगाने पसरत असल्यानं ही आकडेवारी समोर आल्याचा इशारा WHO ने दिला आहे. कारण प्रत्येक देशात चाचणी कमी होत आहे. डब्ल्यूएचओच्या मते, हे आकडे चुकीचे सिद्ध होऊ शकतात. कारण कमी चाचण्यांमुळे कोरोनाच्या प्रार्दुभावाचे योग्य चित्र समोर येत नाही.
चीनमध्ये कोरोना विषाणूचे नवे रुग्ण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तिकडे बोलायचे झाले तर, गेल्या २४ तासांत म्हणजेच चीनमध्ये कोरोनाचे १२९३ रुग्ण आढळले आहेत. तर भारतातच गेल्या २४ तासांत १२३३ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहेत. मात्र, चीन सरकारच्या झिरो-कोविड धोरणामुळे तेथे कठोर पाऊलं उचलण्यात येत आहे. तर भारतात १ एप्रिलपासून सर्व निर्बंध हटवले जात आहेत. चीनमधील ओमायक्रॉन बी.ए. २ रुग्ण सापडत आहेत