नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर (Coronavirus) अजूनही जगभरात सुरू आहे. दीड वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही जग अद्याप कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त झालेले नाही. यादरम्यान, भारतासह संपूर्ण जगाने कोरोनाचे (Corona in World)विविध व्हेरिएंट आणि त्याचे गंभीर परिणाम पाहिले आहेत. तरीही कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट (Covid19 New Variant) वेगवेगळ्या देशांमधून समोर येत आहेत. (Coronavirus: new variant cases of epsilon variant increase in pakistan this virus is transmitted very fast)
2020 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये आढळलेला कोरोनाचा एप्सिलॉन व्हेरिएंट (Epsilon variant) आता पुन्हा एकदा लोकांना संक्रमित करत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये कोरोनाचा हा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. पाकिस्तानमध्ये या संसर्गाची अनेक प्रकरणे नोंदवली आहेत.
लाहोरमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटच्या पाच नवीन प्रकरणांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. एप्सिलॉन व्हेरिएंट न्यूयॉर्कमधील दुसरा सर्वात घातक कोरोना व्हेरिएंट होता, जो लसीला प्रतिरोधक होता आणि तो डेल्टा व्हेरिएंटप्रमाणेच वेगाने वाढतो, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, संपूर्ण जगाने एप्रिल आणि मे महिन्यात भारतात आलेल्या डेल्टा व्हेरिएंट विनाशकारी परिणाम पाहिले आहेत. डेल्टा व्हेरिएंट दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत समोर आला. आता कोरोनाच्या एप्सिलॉन व्हेरिएंटमध्ये दक्षिण आशियात प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, आता त्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सर्वात आधी कॅलिफोर्नियामध्ये आढळला होताएप्सिलॉन व्हेरिएंट - ज्याला CAL.20C असेही म्हणतात. पहिल्यांदा कॅलिफोर्नियामध्ये आढळला होता. युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलनेही (सीडीसी) याबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. हा व्हायरस अमेरिकेसह एकूण 34 देशांमध्ये आढळला आहे. मात्र तो अजून फार मोठ्या प्रमाणावर नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये अमेरिकेत व्हायरसच्या एकूण प्रकरणांच्या 15 टक्के रुग्णांमध्ये हा व्हेरिएंट आढळला होता.
लस प्रतिरोधक आहे एप्सिलॉन हा व्हेरिएंट अधिक प्राणघातक आहे, कारण हा लस प्रतिरोधक आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे दिसून आले आहे की, व्हेरिएंट लसींसाठी अधिक प्रतिरोधक आहे. 1 जुलै रोजी पीअर-रिव्ह्यू जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे की, एप्सिलॉन स्ट्रेन "लॅब-जनरेटेड अँटीबॉडीज पूर्णपणे टाळू शकतो आणि लसीकरण केलेल्या लोकांच्या प्लाझ्मामध्ये निर्माण झालेल्या अँटीबॉडीजची प्रभावशीलता कमी करू शकतो."
हा व्हेरिएंट वेगाने पसरतोआतापर्यंत समोर आलेल्या कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटपैकी हा व्हेरिएंट लोकांमध्ये अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोक खूप कमी वेळात याला बळी पडू शकतात. एका अहवालानुसार, हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा 20 टक्के वेगाने पसरते.