नवी दिल्ली : प्लाझ्मा थेरपीचे उपचार घेतलेल्या कोरोना रुग्णांमध्ये त्यानंतर या विषाणूचे उत्परिवर्तन होऊन नवा कोरोना विषाणू तयार झाला. अशाच प्रक्रियेमुळे ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू असलेला पहिला रुग्ण आढळला.यासंदर्भात नेचर या नियतकालिकात एक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, प्लाझ्मा थेरपी व विषाणूचे उत्परिवर्तन होऊन नवा विषाणू तयार होणे या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे. कोरोना झालेल्या रुग्णांवर सुमारे १०१ दिवसांत रेमडेसिवीर, अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड्स व प्लाझ्मा थेरपीच्या साहाय्याने व्यवस्थित उपचार करण्यात आले होते. केंब्रिज विद्यापीठातील संशोधक रवींद्र गुप्ता यांनी सांगितले की, उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांच्या शरीरातून आम्ही २३ वेळा कोरोना विषाणूचे नमुने गोळा केले. कोरोना विषाणूमध्ये पहिले उत्परिवर्तन झाल्याची घटना चीनमध्ये घडली. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांमधील विषाणूचे उत्परिवर्तन होत असल्याच्या प्रक्रियेचा मागोवा शास्त्रज्ञांनी घेतला. या देशात आढळलेला नव्या प्रकारचा कोरोना विषाणू हा मूळ विषाणूपेक्षा अधिक संसर्गशक्ती असलेला व घातक आहे. ब्रिटनच्या नव्या कोरोना विषाणूने बाधित झालेले रुग्ण अनेक देशांमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना काही देशांनी तात्पुरती प्रवेशबंदी केली आहे.को-विन ॲप नोंदणी; आधारची गरज नाहीकोरोनावरील लसीकरणासाठी विकसित करण्यात आलेल्या कोविनॲपवर नोंदणीसाठी आधार क्रमांकाची आवश्यकता नसल्याचे लोकसभेत केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी ही माहिती दिली.
CoronaVirus News: ब्रिटनमध्ये प्लाझ्मा थेरपी घेतलेल्या रुग्णांमध्ये सापडला नवा विषाणू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 11:48 PM