वेलिंग्टन: जगभरात कोरोनाचा फैलाव झाला असून, लॉकडाऊनमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी कठोर निर्बंधही पाळले जात आहेत. पण तरीही त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. न्यूझीलंडमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, त्या देशाला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आलं आहे.न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही योजना तयार केल्या आहे. त्याची माहिती त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून देशाच्या जनतेलाही दिली आहे. देशामधील कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पर्यटन हा प्रमुख व्यवसाय असलेल्या न्यूझीलंडमधील कंपन्यांनी चार दिवसांच्या आठवड्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा, असंही त्या म्हणाल्या आहेत. चार दिवसांचा आठवडा करावा की नाही हा निर्णय कंपनी आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी विचारविनिमय करून घ्यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजे या निर्णयाची कोणावरही सक्ती नाही. कोरोनाच्या साथीमुळे वर्क फ्रॉम होम करणं शक्य असल्याचे सिद्ध झालं असून, चार दिवसांच्या आठवड्याचं त्यांनी समर्थन केलं आहे. कंपन्यांनी नक्कीच यासंदर्भात विचार करावा, असंही त्यांनी सांगितलं आहे. तुमची कंपनी कशी फायद्यात राहील याचा विचार करा. तुमच्या एका विचारानं देशातील पर्यटन वाढण्यास नक्कीच मदत होईल,” असं मत आर्डेन यांनी फेसबुक लाइव्हमध्ये म्हणाल्या आहेत. चार दिवसांचा आठवडा केल्याने काम आणि खासगी आयुष्य या दुहेरी भूमिका सांभाळणे सहजसोपे होणार आहे. देशांतर्गत पर्यटन वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात सरकारला अनेकांची सल्ले प्राप्त झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा
VIDEO: गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक आला सिंहांचा कळप अन्...
CoronaVirus News : कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेत
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देणार अन् 15000 जणांची भरती करणार
जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी
घाबरू नका! पुन्हा येणाऱ्या कोरोना लाटेचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा