वॉशिंग्टन : कोरोनावर शोधून काढण्यात येणारी लस शंभर टक्के प्रभावी असण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र, ही लस ५० टक्के जरी प्रभावी असेल, तर एक वर्षाच्या आत जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल, असे संसर्गजन्य रोगांचे अमेरिकेतील आघाडीचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे.कोरोना साथीसंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार म्हणूनही फौसी सध्या काम पाहत आहेत. त्यांनी सांगितले की, पुढच्या वर्षीपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या साथीला प्रभावी आळा घालता येईल. त्यामुळे २०२१ च्या अखेरीपर्यंत जगातील जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस विकसित झाली तरी हा विषाणू पृथ्वीतलावरून नष्ट होणार नाही, याची प्रत्येकाने नोंद घेतली पाहिजे. जगातून फक्त देवीचे विषाणू नष्ट करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. कोरोनाच्या लसीमुळे या विषाणूचे उपद्रव्यमूल्य कमी करता येईल.>रशियाच्या लसीबद्दल प्रश्नरशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या गुणवत्तेबद्दल आम्हाला अनेक शंका आहेत, असे डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले. ते म्हणाले की, एखादी लस बनविणे व ती सुरक्षित या वेगळ्या गोष्टी आहेत.
CoronaVirus News : ...तर ५० टक्के प्रभावी लसीनेही साथ नियंत्रणात येईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:50 IST