दुबई : कोरोना साथीमुळे इतर उद्योगधंद्यांबरोबरच विमान कंपन्यांनाही मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. परिणामी मध्य-पूर्वेतील एमिरेट्स ही विमान कंपनी नऊ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार आहे.विमान कंपनीचे अध्यक्ष सर टीम क्लार्क यांनी सांगितले, एमिरेट्समध्ये सुमारे ६० हजार कर्मचारी होते. कोरोना साथीमुळे कंपनीने एक दशांश कर्मचाºयांना नोकरीतून काढले होते. सध्याची परिस्थिती पाहता आणखी नोकरकपात करावी लागेल. एमिरेट्समधील १५ टक्के नोकरकपात आवश्यक झाले आहे. कोरोनामुळे इतर विमान कंपन्यांना झाला तितका तोटा एमिरेट्सला झालेला नाही. ते म्हणाले, कोरोनाच्या साथीमुळे विमान कंपन्यांची आर्थिक स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. एमिरेट्स कंपनीत सध्या ४५०० पायलट आहेत. त्यापैकी १२०० पायलटच्या नोकºया जाण्याची शक्यता आहे. बोइंग विमाने चालविणाºयांपेक्षा फ्लाय एअरबस चालविणाºया वैमानिकांच्या नोकºयांवर गदा येणार आहे. सुपरजंबो एअरबस ए३८० विमानातून ५०० जण प्रवास करतात. त्याहून बोइंग ७७७ विमानाची प्रवासी क्षमता कमी आहे. त्यामुळे बोइंग विमानांची उड्डाणे अधिक सुरू ठेवण्यावर भर देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
CoronaVirus News : ‘एमिरेट्स’च्या ९ हजार कर्मचाऱ्यांची कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 1:39 AM