वॉशिंग्टन: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं आतापर्यंत अडीच लाख लोकांचा जीव घेतला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोना संकटासाठी चीनला जबाबदार धरत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा चीनवर आरोप केले आहेत. यानंतर आता ट्रम्प यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत चिनी वस्तूंवर अधिक कर लावण्याचा निर्णय घेतला आहे.चीनला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्यासाठी अमेरिकन प्रशासनानं चिनी वस्तूंवर अतिरिक्त कर आकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेत याच वर्षी निवडणूक होत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी परदेशांमधले उत्पादन निर्मिती करणारे कारखाने मायदेशी आणण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं आहे. त्याचाच भाग म्हणून आता चिनी वस्तूंवरील कर वाढवण्यात आला आहे. यामुळे चीनमधून येणाऱ्या वस्तूंची किंमत वाढून त्या उत्पादनांना असणारी मागणी घटण्याची दाट शक्यता आहे.कोरोना विषाणू नैसर्गिकरित्या पसरला की चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत त्याची निर्मिती करण्यात आली, याबद्दलचे सबळ पुरावे अद्याप सापडले नसल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. मात्र अमेरिकन सरकारनं वैज्ञानिकांचा दावा बाजूला ठेवून चीनला लक्ष्य केलं आहे. कोरोना विषाणूची निर्मिती वुहानमधल्या एका प्रयोगशाळेत झाल्याचे पुरावे सरकारकडे असल्याचं परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणू डिसेंबरमध्ये वुहानमध्ये पसरला. कोरोनाचं संकट मानवनिर्मित आहे. अनेक तज्ज्ञांनीदेखील यावर भाष्य केलं असल्याचंही माईक पॉम्पियो पुढे म्हणाले. 'याबद्दल अविश्वास व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणतंही कारण नाही. विषाणूंच्या माध्यमातून संसर्ग पसरवण्याचा चीनचा इतिहास आहे. स्वच्छता आणि सुरक्षा प्रक्रियांचा विचार केल्यास चीनमधल्या प्रयोगशाळांचा दर्जा अतिशय वाईट आहे,' असं परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं."त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणारदिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ जण कोरोनामुक्त; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण २८ टक्क्यांवर
चिनी ड्रॅगनला घायाळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी; अमेरिकेकडून मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 9:45 AM