चीनला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. चीनच्या बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये 6.1 टक्क्यांपर्यंत वाढला, जो फेब्रुवारी 2020 मध्ये कोरोना साथीच्या सुरुवातीस 6.2 टक्क्यांच्या शिखरानंतरचा उच्चांक आहे. बीबीसीने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत लॉकडाऊनमुळे तीव्र मंदी आली असल्याचं म्हटलं आहे. किरकोळ विक्रेते आणि उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याचे अधिकृत आकडेवारीवरून दिसून येते. मार्च आणि एप्रिलमध्ये अनेक शहरांनी पूर्ण किंवा आंशिक लॉकडाऊन जाहीर केले, ज्यात व्यावसायिक केंद्र शांघाईच्या दीर्घकाळ लॉकडाऊनचा समावेश आहे. बीबीसीने वृत्त दिले.
चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी अलीकडेच 2020 नंतरच्या कोरोना व्हायरसचा सर्वात वाईट उद्रेक झाल्यानंतर देशातील रोजगाराची परिस्थिती "जटिल आणि गंभीर" असल्याचं वर्णन केले आहे. तरीही, संपूर्ण वर्षभर बेरोजगारीचा दर 5.5 टक्क्यांच्या खाली ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. लॉकडाऊनचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे बेरोजगारी वाढली. त्याचवेळी, एक वर्षापूर्वीच्या तुलनेत औद्योगिक उत्पादनात 2.9 टक्क्यांनी घट झाली, कारण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा पुरवठा साखळींवर मोठा परिणाम झाला आहे.
शांघाईमध्ये मोठा लॉकडाऊन
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2020 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. तसेच लॉकडाऊन संपवण्याची योजना आखली जात आहे. लोकांना एक वेळचं जेवण मिळणं देखील कठीण झालं आहे. चीनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. चीन सोमवार ते बुधवार या कालावधीत 12 जिल्ह्यांमध्ये तीन अतिरिक्त सामूहिक न्यूक्लिक अॅसिड चाचण्या आयोजित करेल. चीनच्या राजधानीत कोविड-19 संसर्गाची नवीन प्रकरणे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. हे 12 जिल्हे म्हणजे डोंगचेंग, जिचेंग, चाओयांग, हैडियान, फेंगटाई, शिजिंगशान, फांगशान, टोंगझोउ, शुनी, चांगपिंग, डॅक्सिंग आणि बीजिंग आर्थिक-तंत्रज्ञान विकास क्षेत्र आहेत.
कोरोनाचा हाहाकार! चीनमध्ये संसर्ग रोखण्यासाठी 'अशा' केल्या जाताहेत टेस्ट; रुग्णांनी वाढवली चिंता
सिन्हुआ वृत्तसंस्थेने बीजिंग नगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे की, आरोग्य आयोगाच्या ताज्या हालचालीमध्ये 13 ते 15 मे या कालावधीत 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये मेंटौगौ, पिंग्गु, हुआरौ, मियुन आणि यानकिंग येथील रहिवाशांना नियमित न्यूक्लिक अॅसिड चाचणी करणे आवश्यक आहे. वांग म्हणाले, 13-15 मे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर चाचणी करताना आरोग्य अधिकाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक आणि कुरिअर क्षेत्रे तसेच बांधकाम साइटसह प्रमुख उद्योग आणि अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे.