चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली व तेथील एका अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच चीनने धमक्या दिल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना संर्दभातली माहिती लपवून ठेवल्याचा धक्कादायक आरोप अमेरिकेने केला आहे. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेला करण्यात येणारी मदतही रोखण्याचा मोठा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. मात्र आता चीन जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीला धावून आली आहे.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग म्हणाले की, आतापर्यत चीनवर अनेक आरोप करण्यात आले आहे. मात्र या आरोपमध्ये काहीही तथ्य नसल्याचे क्षी जिनपिंग यांनी सांगितले. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला आगामी दोन वर्षांसाठी 2 बिलियन डॉलर्सची (भारतीय रकमेनुसार १५१ अब्ज ३२ कोटी ८४ लाख) मदत करत असल्याचे देखील क्षी जिनपिंग यांनी जाहीर केले आहे.
कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटाना चीन केंद्रित काम करत असल्याचा आरोप केला होता. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणारा निधी रोखण्याचा निर्णय देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता.
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच सीआयएने दावा केला आहे की, चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची माहिती कशी लपवली आणि दोघांनी नक्की कोणत्या प्रकारची योजना आखली होती यासंर्दभातील सर्व पुरावे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जर कोरोनाची माहिती ताबडतोब जाहीर केली तर आम्ही कोरोना संक्रमणाच्या तपासणीत सामिल होणार नाही, अशी चीनने धमकी दिली होती. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत जगाला अलर्ट करण्यात उशिर केला असा आरोप अमेरिकेने केला आहे.