शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

CoronaVirus News : संसर्ग टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतात हायड्रोक्लोरोक्विन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:25 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गेल्या दीड आठवड्यापासून हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेण्यास मी सुरुवात केली आहे.

न्यूयॉर्क : कोरोना विषाणूचा संसर्ग न होण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेत आहेत. या औषधावरून अमेरिकेत झालेले वाद निरर्थक आहेत असेही ते म्हणाले.वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गेल्या दीड आठवड्यापासून हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेण्यास मी सुरुवात केली आहे. या गुणकारी औषधाबाबत अनेक चांगल्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. हे औषध घेतल्याने अमुक एक दुष्परिणाम होतील असे जे बोलले जाते त्यात तथ्य नाही. मी हे औषध घेतल्यानंतरही धडधाकट आहे. तुमच्यासमोर उभा आहे, असेही ते म्हणाले.हायड्रोेक्लोरोक्विन या औषधाचा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरस्कार केल्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते चक स्कमर यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी विशिष्ट औषधामुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध करता येतो असे सांगून विनाकारण आशा पल्लवित केल्या आहेत. ट्रम्प करत असलेली कृती भयंकर आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून हायड्रोक्लोेरोक्विन हे औषध आपल्याला देण्यात यावे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील डॉक्टरना सांगितले होते. ट्रम्प यांच्या म्हणण्याला डॉक्टरांनी एका पत्रकाद्वारे दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची रोज कोरोना चाचणी केली जाते. या विषाणूचा त्यांना संसर्ग झालेला नसल्याचा निष्कर्ष त्यातून आला आहे. हायड्रोक्लोरोक्विन हे औषध ४० वर्षांपासून मलेरिया व इतर आजारांवर घेतले जाते. संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी हे औषध घेत आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प