पॅरिस : फ्रान्सने नागरिकांसाठी कोरोना विषाणूची चाचणी मोफत केली आहे. आरोग्यमंत्री ऑलिव्हर वरेन यांनी रविवारी यासंदर्भात घोषणा केली. कोरोना विषाणूची चाचणी करणाऱ्या नागरिकांना परतावा(रिफंड) मिळणार असल्याचे ओलिवर वरेन यांनी सांगितले.
ओलिवर वरेन यांनी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "मी एका आदेशावर शनिवारी स्वाक्षरी केली. ज्यामध्ये आजपासून कोणीही पीसीआर चाचणीसाठी केलेला खर्च पूर्णपणे परत घेऊ शकतो. यासाठी डॉक्टरांचा आदेश किंवा वैध कारण आवश्यक नाही. तसेच, हा नियम कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना सुद्धा लागू होणार आहे. "
फ्रान्समधील वाढत्या कोरोना रुग्णांबाबत आरोग्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. पण, ते म्हणाले, "आम्ही सध्या दुसऱ्या लाटेबद्दल बोलू शकत नाही. मात्र, एक गोष्ट नक्कीच आहे की, आम्ही गेल्या काही दिवसांत कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढताना पाहिली आहेत. तर, सतत १३ आठवड्यांपर्यंत ही प्रकरणे कमी होत होती." याचबरोबर, तरुणांना सावध राहण्याचा आणि कोरोना विषाणू हलका समजू नका, असे आवाहन ओलिवर वरेन यांनी केले. दरम्यान, फ्रान्समधील तरुणांना सामाजिक समारंभ पुन्हा सुरू करायचे आहेत.
फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांची संख्या आतापर्यंत २,१७,८०१ वर पोहोचली आहे. जगभरात रविवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची संख्या १.६ कोटी झाली आहे. तर ६,४४,००० पेक्षा अधिका लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूच्या बाबतीत अमेरिकेतील संख्या जास्त आहे. अमेरिकेत ४१, ७८,०२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ब्राझील दुसर्या क्रमांकावर आहे. ब्राझीमध्ये २३, ९४, ५१३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आणखी बातम्या...
'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी
आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी