शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

CoronaVirus News: ...तर कोरोना संकटाची तीव्रता होईल कमी; जगभरातील तज्ज्ञांनी सांगितला रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 10:13 AM

जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; कोरोनाच्या आणखी लाटा येण्याची शक्यता

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या भविष्यात अनेक लाटा येण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचबरोबर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याने प्रत्येक लाटेबरोबर कोरोना संसर्गाची तीव्रता कमी होत जाईल असे मत जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.त्यांनी सांगितले की, कोरोना साथीला रोखण्याचा लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असून त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना लस देणे आवश्यक आहे. दिल्लीतील डॉक्टर अंबरीश सात्विक यांनी सांगितले की, जोपर्यंत ही साथ रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना होणार नाही, तोवर कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढत राहणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर शंकरा चेट्टी यांनी सांगितले की, जगात कोरोनाच्या पहिल्या लाटेत कृष्णवर्णीयांमध्ये या साथीचा मोठा फैलाव झाला होता. मात्र, आता कृष्णवर्णीयांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली तरी तिचा परिणाम आधीच्या लाटांपेक्षा नक्कीच कमी असेल. या वर्षाच्या अखेरीस कोरोना रुग्णांच्या संख्येत खूप मोठी घट झाल्याचे सर्वांना पहायला मिळेल. या विषाणूसोबतच यापुढे जगावे लागणार आहे. मात्र, या विषाणूचा पूर्वीइतका त्रास कोणालाही होणार नाही.काय आहे सामूहिक प्रतिकारशक्ती?कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर नैसर्गिकरीत्या निर्माण होणारी सामूहिक प्रतिकारशक्ती तसेच लस देऊन निर्माण झालेली सामूहिक शक्ती असे दोन प्रकार आहेत. कोरोनाच्या विषाणूचे मानवी शरीरात उत्परिवर्तन होते. ते दाराचे हँडल, रेलिंग किंवा हवेत असताना होत नाही. एकूण लोकसंख्येच्या विशिष्ट प्रमाणातील लोकांना विषाणूचा संसर्ग होऊन त्यांच्यात नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली किंवा लसीमुळे ही प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर त्याला सामूहिक प्रतिकारशक्तीचे रूप येते. त्यामुळे संसर्गाचा प्रसार कमी होतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस