सॅनफ्रॅन्सिस्को : सातत्याने घरातूनच काम करायला लावल्यास त्याचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्य व समाजातील लोकांशी असलेल्या संवादावर विपरित परिणाम होईल, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सत्या नाडेला यांनी दिला आहे.जगभरात कोरोना साथीपायी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाºयांना घरातूनच काम करण्यास सांगितले आहे. आपल्या कर्मचाºयांनी यापुढे कायम घरातूनच काम करावे, असा आग्रह टिष्ट्वटर कंपनीने धरला आहे. या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत सत्या नाडेला यांनी सांगितले, की माणसांचा माणसांशी समोरासमोर बसून संवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. माणसांचा परस्परांशी व्हर्च्युअल संवादच करीत राहिली तर त्यांचे मानसिक आरोग्य व सामाजिक सहजसंवादावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकेल. एका रुढीऐवजी दुसरी रुढी प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात माणूस अनेक गोष्टी हरवून बसेल.कर्मचाºयांना घरातूनच काम करायला सांगण्यामध्ये त्या कंपनीचे अनेक फायदे असू शकतात. एखाद्या कंपनीच्या कार्यालयांसाठी लागणाºया जागेचे, विजेचे भाडे, पाणीपट्टी व इतर सुविधा पुरविण्याचा मोठा खर्च कर्मचाºयांनी घरातूनच काम केल्यामुळे वाचविता येणे शक्य होते.सत्या नाडेला यांनी सांगितले, की प्रत्येक माणूस दुसºयाशी जोडला जाणे आवश्यक असते. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व कर्मचारी घरातूनच काम करायला लागले तर ते परस्परांशी प्रत्यक्ष संवाद साधणार कधी? समाजातील सुसंवाद टिकवून ठेवण्याच्यादृष्टीने ही स्थिती अजिबात चांगली नाही.फेसबुक, अल्फाबेट (गुगल) व अन्य कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना या वर्षाच्या अखेरीपर्यंत घरातूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या कर्मचाºयांना आॅक्टोबरअखेरपर्यंत घरातूनच काम करण्यास सांगितले आहे. सत्या नाडेला म्हणाले, कीलॉकडाऊनच्या संकटकाळात लहान उद्योगांना मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे कशी मदत करता येईल, याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
CoronaVirus News : घरातून काम करणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणार परिणाम : सत्या नाडेला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:32 AM