बीजिंग : कोरोनाच्या संकटामुळे जगातील सगळ्याच देशांना मोठा फटका बसला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाही संकटात सापडल्या आहेत. याला चीनही अपवाद नाही. सध्याच्या स्थितीत जगभराचे उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून चीनचे असलेले महत्त्व कमी होण्याच्या मार्गावर आहे. ही संधी साधत भारताने ही जागा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.काही कंपन्यांनीही आपले चीनमधील उत्पादनांचे कारखाने भारतात हलविण्याचे ठरविले आहे. यामुळे भेदरलेल्या चीनने भारतावर टीका करीत आमची जागा तुम्ही कधीच घेऊ शकणार नाही, असे सुनावले आहे. चिनी सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने भारताच्या धोरणावर तोेंडसुख घेत चीनला भारत कधीही पर्याय ठरू शकत नाही, अशी टीका केली आहे.अलीकडेच एका जर्मन शू कंपनीने आपला चीनमधील उत्पादनाचा कारखाना उत्तर प्रदेशमध्ये हलविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.चीनबाबत वाढलेल्या नाराजीमुळे इतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपली उत्पादन केंद्रे अन्यत्र हलविण्याच्या विचारात आहेत. चीन सोडून इतर पयार्यांचा विचार करणाऱ्या कंपन्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक टास्क फोर्सही तयार केल्याचे समजते. यामुळेच चीनमधील चिंता वाढली आहे.ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात भारत जगातील प्रमुख उत्पादकाची जागा घेऊ शकत नाही. भारत चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, असा प्रचार व्यर्थ अभिमान बाळगणारे लोक करीत आहेत; पण हे निव्वळ प्रचारतंत्र आहे. खरेतर हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. खरेतर या काळात काही पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी चीनमधील बाजार भविष्यात कसा असेल, यावर चर्चा सुरू केली. भारताची स्पर्धात्मकता वाढविण्याचा उत्साह त्यांनी दाखवला. त्यामुळे काही भारतीय वास्तव स्थिती लक्षात न घेता विचार करू लागले आहेत.
CoronaVirus News : भारत हा चीनला कधीच पर्याय ठरू शकत नाही, चिनी वर्तमानपत्राची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 2:08 AM