वेलिंग्टन : कोरोना साथीमुळे न्यूझीलंडमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात येत असून तेथील हॉटेलमध्ये मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जात आहे. याचा फटका दस्तूरखुद्द त्या देशाच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन व त्यांचा ज्यांच्याशी साखरपुडा झाला आहे त्या क्लार्क गेफोर्ड या जोडप्याला बसला. शनिवारी रात्री ते जिथे जेवायला गेले त्या आॅलिव्ह हॉटेलमध्ये ठरलेल्या संख्येइतक्या माणसांना आधीच प्रवेश दिल्याने एकही जागा रिकामी नव्हती. त्यामुळे हे जोडपे तिथून माघारी परतले.कोरोना साथीमुळे लागू केलेले निर्बंध न्यूझीलंडमध्ये काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर, रेस्टॉरंटसहित आणखी काही दुकानेही पुन्हा सुरू करण्यात आली. या निर्णयानंतर दोन दिवसांतच न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथे ही घटना घडलीे. निर्बंध शिथिल केले असले तरी न्यूझीलंडमध्ये सर्वत्र फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम अद्यापही पाळणे बंधनकारक आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीपासून किमान ३ फूट अंतर ठेवावे, असा आदेश सरकारने काढला आहे.या नियमामुळे रेस्टॉरंटची माणसे सामावून घेण्याची क्षमतादेखील कमी झाली आहे. वेलिंग्टन येथील आॅलिव्ह हॉटेलमध्ये जेसिंडा आर्डेन व क्लार्क गेफोर्ड हे जोडपे गेले असता तिथेसध्या निश्चित केलेल्यासंख्येएवढी माणसे आधीपासूनच असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या जोडप्याला तिथे लगेचच जागा मिळणे अशक्य होते. हे लक्षात आल्यावर जेसिंडा व क्लार्क हे दोघेही तिथून निघाले. हा प्रसंग त्यावेळी आॅलिव्ह हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी एकाने टिष्ट्वटरवर लिहिला.नेटकऱ्यांकडूनही कौतुकफिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळताना आॅलिव्ह हॉटेलने चक्क पंतप्रधानांना प्रवेश देण्यास नकार दिला, या गोष्टीचे नेटकºयांनी खूप कौतुक केले आहे. या प्रसंगाबाबत क्लार्क गेफोर्ड यांनी लिहिले आहे, की या सर्व प्रकाराची जबाबदारी मी स्वीकारत आहे.जेसिंडा यांना हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाताना मी सीट रिझर्व्ह केली नव्हती. त्यामुळे जागा उपलब्ध नसल्याने आॅलिव्ह हॉटेलमधून आम्हाला माघारी जावे लागले. या प्रसंगाबद्दल पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांच्या कार्यालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, की लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आला असता, तसाच अनुभव जेसिंडा यांना आला. पंतप्रधानांना कोणतीही विशेष वागणूक नको होती.
CoronaVirus News : हॉटेलमध्ये जागा नसल्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधान माघारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:54 AM