इस्लामाबादः पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेले 2870 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर रविवारी संक्रमित लोकांची संख्या 33,330वर गेली आहे. आधीच आर्थिक आघाडीवर झगडत असलेल्या पाकिस्ताननं कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्मार्ट लॉकडाऊन' राबविण्याच्या योजनेवर पाकिस्तान काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानमधील नियोजन मंत्री असद उमर यांनी रविवारी माध्यमांना सांगितले की, ते 'स्मार्ट लॉकडाऊन' राबविण्याच्या योजनेवर काम करत आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोना व्हायरस हॉटस्पॉट्स शोधणे शक्य होणार आहे. लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे निम्न उत्पन्न गटातील लोकांवर फार वाईट परिणाम होत आहेत. परंतु सावधगिरी बाळगली म्हणजे सर्व खबरदारीच्या उपाययोजना मागे घेण्यात आल्या आहेत, असं होतं नाही.कोरोनाचे हॉटस्पॉट्स ओळखण्यासाठी आणि 'स्मार्ट लॉकडाऊन' लागू करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. ओमर म्हणाले की, डेटा संकलित केला जात आहे आणि कोरोना विषाणूशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी देशभरातील सर्व रुग्णालयांना वेब पोर्टल तयार करण्यासाठी डेटा प्रदान करण्यास सांगितले जाईल. पंजाब सरकारने एक अॅप तयार केले आहे, जेणेकरून किती रिक्त बेड आहेत आणि किती व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, अशी माहिती मिळणार आहे. या माहितीचा कोरोनाग्रस्तांना उपयोग होणार आहे. त्यांनी सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन केले आणि असे सांगितले की, व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.शनिवारपासून टाळेबंदीतून काहीसा दिलासापाकिस्तानमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण सापडत असूनही लॉकडाऊनमधून सूट देण्याच्या पहिल्या टप्प्याचा शनिवारी प्रारंभ झाला. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बरेच व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. पण डॉक्टरांनी या सवलतीविरोधात इशारा दिला आहे. सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांचे पालन केले पाहिजे आणि बंदची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी पाकिस्तान मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी केली आहे.अन्य महत्त्वाच्या बातम्या
पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?
ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज