जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 26 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 266,879,038 वर पोहोचली आहे, कोरोनामुळे 5,281,541 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 240,496,466 जण कोरोनातून बरे झाले आहेत. काही देशांमध्ये कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही लोकांना ख्रिसमस पार्टी चांगलीच महागात पडली आहे. ख्रिसमस पार्टीत सहभागी झालेले 68 डॉक्टर-नर्स पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स हे एका ख्रिसमस पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर त्याच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणं आढळून आली. आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वांची कोरोना चाचणी केली असता. त्यामध्ये तब्बल 68 जणांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. मलागा येथील रुग्णालयातील हे डॉक्टर आणि नर्स आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग नेमका कसा झाला याचा शोध घेण्यात येत आहे. ख्रिसमस पार्टीमध्ये 173 लोकांनी सहभाग घेतला होता. त्यातील 68 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
लोकांना आता सतर्क राहण्याचं आवाहन
ख्रिसमस पार्टीमध्ये सहभागी झालेल्या लोकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली होती. आता कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये कोरोनाची थोडी लक्षणं आढळून आली आहेत. ख्रिसमसमध्ये लोकांना प्रशासनाने आता सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. निष्काळजीपणा घातक ठरू शकतो असं म्हटलं आहे. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ख्रिसमस पार्टीमध्ये सहभागी होऊ नका असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हवेतून पसरतोय कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
हवेतून ओमायक्रॉन व्हेरिएंट पसरत असल्याचा धक्कादायक खुलासा रिपोर्टमधून करण्यात आला आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये असूनही दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा (Omicron) संसर्ग पसरला आहे. हॉटेलमध्ये समोरा-समोर खोलीत राहणाऱ्या दोन प्रवाशांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे दोन्ही प्रवाशांना कोरोना लसीचे सर्व डोस मिळाले होते. ओमायक्रॉनचा संसर्ग हवेतूनही पसरत असल्याचा यावरून दावा केला जात आहे. त्यामुळेच हाय म्युटेशन असलेल्या या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे.
जर्नल इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजमध्ये याबद्दल माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या दोन रुग्णांवर केलेल्या स्टडीनुसार, 13 नोव्हेंबरला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्याला कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला नंतर हॉटेलमध्ये वेगळे ठेवले गेले, तर दुसऱ्या रुग्णामध्ये 17 नोव्हेंबर रोजी सौम्य लक्षणे दिसली आणि तो SARS-CoV-2 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीज या जर्नलमध्ये शुक्रवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासात, हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी माहिती दिली.