दिल्ली : एका आकस्मिक निर्णयाद्वारे चीनने आपल्या स्टॉक एक्स्चेंज व्यवहारातून अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरला बहिष्कृत केले आहे. चीनच्या या निर्णयामुळे चीनचे चलन युआनच्या तुलनेत डॉलरची घसरण होणार असून त्याचा विपरीत परिणाम जागतिक बाजारपेठांवर होणार आहे. वैश्विक अर्थव्यवहारांवर आपला शिक्का उमटवू पाहाणाऱ्या चीनतर्फे टाकलेले हे अत्यंत धाडसी पाऊल असल्याचे मानले जाते. त्याचे पडसाद अर्थातच जगभरात त्वरेने उमटले. बीबीसी वृत्तवाहिनीने या संदर्भात तज्ज्ञांची मते जाणून घेतली असता या निर्णयामुळे अमेरिकेने जर आक्रमक प्रतिसाद दिला तर युद्धजन्य परिस्थिती ओढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दरम्यान चीन डॉलरशी झुंज घेण्यासाठी वेगळ्या डिजिटल चलनावरही गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त आहे.
कोरोना साथीच्या काळात चीनला झुकते माप देणारी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेने घेतल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. तसेच या संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधीही ट्रम्प यांनी रोखला आहे. आपल्या निर्णयाचे समर्थन करताना ट्रम्प यांनी सांगितले की, एखाद्याने भयंकर चूक केल्यास त्याला पाठीशी घालणे योग्य नाही. चीनमधून फैलावलेल्या कोरोनाच्या साथीने जगभर धुमाकूळ घातला असून, दोन लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. एखाद्याच्या चुकीमुळे जर अनेकांचा जीव जात असेल तर त्या कृत्याचा संबंधितांना जाब विचारायलाच हवा. पण जागतिक आरोग्य संघटनेने असे काहीही केले नाही. चीनच्या बाजूने बोलत राहाण्यात या संघटनेने धन्यता मानली.चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली व तेथील एका अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असा आरोप काही देशातील शास्त्रज्ञांनी केला होता. चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्भव कसा झाला व ती साथ जगभरात कशी पसरली याचा अमेरिका सखोल तपास करत आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी सांगितले होते.>अमेरिका नाराजडोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने तटस्थ भूमिका घेऊन कोरोना साथीच्या स्थितीकडे पाहायला हवे होते. चीनकडून किती मोठी चूक झाली आहे हे जाणवूनही या संघटनेने त्या देशाला खडसावले नाही. ही गोष्ट अमेरिकेला खटकली आहे. आम्ही खूप नाराज आहोत असेही ट्रम्प यांनी सांगितले.