शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

Coronavirus Omicron Updates : दिलासादायक! ओमायक्रॉनच्या संकटात 'गुड न्यूज'; कोरोनाचा वेग मंदावतोय, WHO ने शेअर केला नवा डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 2:55 PM

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंटचे (Omicron Variant) मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत.

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंटचे (Omicron Variant) मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिअंट हा डेल्टा व्हेरिअंटपेक्षा कमी धोकादायक आहे, असं म्हटलं जातंय. परंतु ते अधिक संसर्गजन्यदेखील आहे. या परिस्थितीतच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) एक चांगली बातमी समोर आली आहे. आफ्रिकेतील चौथी लाट हळूहळू कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

६ आठवड्यांच्या वाढीनंतर, आफ्रिकेत आमायक्रॉन व्हेरिअंटमुळे आलेली चौथी लाट आता कमी होऊ लागली आहे. ११ जानेवारीपर्यंत, आफ्रिकेत कोरोनाचे १०.२ दशलक्ष रुग्ण समोर आले होते. दक्षिण आफ्रिकेत या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. परंतु एका आठवड्यात त्या ठिकाणच्या रुग्णांच्या संख्येत १४ टक्क्यांची घट झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन विषाणूची प्रथम ओळख पटवण्यात आली होती. तेथे देखील साप्ताहिक संसर्गामध्ये ९ टक्क्यांची घट झाली. पूर्व आणि मध्य आफ्रिकन क्षेत्रातही घट नोंदवली गेली आहे. उत्तर आणि पश्चिम आफ्रिकन क्षेत्रात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. उत्तर आफ्रिकेत गेल्या आठवड्यात १२१ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं अधिक लसीकरण करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

लसीची आवश्यकता"सुरुवातीची चिन्हे सूचित करतात की देशातील चौथी लाट वेगवान आणि लहान होती. परंतु अस्थिरतेची कमतरता नाही. आफ्रिकेत महासाथीचा सामना करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या उपाययोजनांची नितांत गरज आहे, ती अजूनही सुरू आहे. परंतु त्यासाठी इथल्या लोकांना लवकरात लवकर कोरोनाची लस मिळणेही आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया आफ्रिकेतील डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी दिली.

गेब्रेयसेस यांनी व्यक्त केली होती चिंताडब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी देखील अलीकडेच चिंता व्यक्त केली की, "आफ्रिकेच्या ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला अद्याप लसीचा एकही डोस मिळालेला नाही. संपूर्ण खंडातील लोकसंख्येपैकी केवळ १० टक्के लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे." आफ्रिकेतील डब्ल्यूएचओच्या Vaccine-Preventable Disease Program कार्यक्रमाचे प्रमुख अॅलेन पॉय म्हणाले की, कोरोनाविरूद्ध लसीकरण होणाऱ्या आफ्रिकन लोकांची संख्या सध्या ६ दशलक्षांपेक्षा कमी आहे, ती एका आठवड्यात ३४ दलशक्षांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना