न्यूयॉर्क : अन्य श्वसनजन्य विषाणूंप्रमाणेच कोरोनाचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आली आहे, असे मत जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर सेक्युरिटीचे डॉ. अमेश अदलजा यांनी व्यक्त केले. अमेरिकेत कोरोना चाचणीबाबतचा दृष्टिकोन बदलत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
शाळांनी आता कोरोनाकडे एन्फ्लूएन्झा, फ्लूप्रमाणे बघितले पाहिजे आणि विषाणूंच्या प्रकारानुसार हाताळणीसाठी पवित्रा घेतला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. अमेरिकेत कोरोनाबाबत कोणते उत्कृष्ट धोरण राबविले जात आहे, अशी विचारणा केली असता डॉ. अमेश अदलजा म्हणाले की, प्रामुख्याने लसीकरणावर भर देण्यात आला आहे. ६५ वर्षांवरील ७० टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. सप्टेंबरमध्ये शाळा सुुरू करण्याबाबत विचार होत आहे. याबाबत बोलताना डॉ. अदलजा म्हणाले की, शाळांमध्ये आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. पार्टिशन, डिस्टन्सिंग, मास्क यांचा वापर करून सुरक्षित राहता येईल.
सोशल डिस्टन्सिंगवर दिला भरभारतात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. रुग्ण वाढत आहेत. याबाबत बोलताना डॉ. अदलजा म्हणाले की, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे आणि घरात थांबणे, हा यावर चांगला उपाय असू शकतो. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात यामुळे कोरोनावर प्रतिबंध आणता येईल.