जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 18,944 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 425,325 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढत असला तरी याच दरम्यान काही दिलासादायक बातम्याही समोर आल्या आहेत. अनेक लोकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
जगभरातील विविध रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील तब्बल 109,225 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच एक लाखांहून अधिक लोक बरे होऊन घरी परतल्याची माहिती मिळत आहे.जागतिक महामारी बनलेल्या कोरोनामुळे इटलीत हाहाकार माजला आहे. चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. आतापर्यंत इटलीत6 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.इटलीत69,176 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यापैकी 8,326 लोक बरे झाले आहेत. अनेक ठिकाणी लोकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच याचदरम्यान रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे.
अनेक देश कोरोनाच्या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. कोरोनानं भारतातही आतापर्यंत 11 जणांचा जीव गेला असून, काही जण कोरोना बाधित असलेले सापडत आहेत. मंगळवारच्या आलेखावर नजर टाकल्यास एक चांगली बातमी समोर आली आहे. मंगळवारी 64 नवे रुग्ण सापडले होते, ते सोमवारच्या तुलनेत फारच कमी होते. सोमवारी जवळपास 99 रुग्ण समोर आले होते. म्हणजेच कोरोनाच्या रुग्णांमध्ये आधीच्या तुलनेत घसरण होत असल्याचं निदर्शनास येतं आहे आणि ती भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 560 वर गेली आहे.विशेष म्हणजे 48 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, त्यांची रुग्णालयातूनही मुक्तता करण्यात आली आहे. सोमवारी अशा रुग्णांची संख्या 35 होती, ज्यात वेगानं वाढ होते आहे. त्यात महाराष्ट्रातल्याही 8 रुग्णांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! …तर भारतात 13 लाख लोकांना होऊ शकतो कोरोना, शास्त्रज्ञांचा इशारा
Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खऱ्या हिरोंसाठी केली प्रार्थना
Coronavirus: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! देशातील रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद
Coronavirus : कोरोनाचा कहर! जगभरात तब्बल 18,892 लोकांना गमवावा लागला जीव