नवी दिल्ली : ‘कोविड-१९’ या आजारावर अनेक देशांमध्ये सुरू असलेले लशीचे संशोधन विविध टप्प्यांवर पोहचले असून अंतिम यशाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. यापैकी ऑक्सफर्डची लस दर वर्षी घ्यावी लागणार असल्याचे पुढे आले आहे.ऑक्सफर्ड विद्यापीठ अॅस्ट्राझेना या इंग्लंडमधील प्रसिद्ध औषध कंपनीच्या सहकार्याने या महत्वाच्या प्रकल्पावर काम करीत आहे. अेऊ1222 या लशीचा प्रभाव एक वर्ष टिकेल. त्यानंतर पुन्हा ही लस घ्यावी लागेल, असे अॅस्ट्राझेनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सॉरियट यांनी सांगितले.मॉडर्ना लस नोव्हेंबरमध्ये?अमेरिका सरकारच्या सहकार्याने मॉडर्ना कंपनीच्या लशीच्या प्रयोगाचा दुसरा टप्पा जूनच्या प्रारंभी सुरू झाला. या लशीचे नाव ेफठअ-1273 असे असून सर्व काही सुरळित पार पडल्यास नोव्हेंबरमध्ये ही लस तयार होईल.इम्पेरियल कॉलेज लंडन फठअ च्या धर्तीवर लस विकसित करीत आहे. आॅक्टोबर महिन्यात ६ हजार लोकांवर लशीचा प्रयोग करण्यात येईल. ते यशस्वी झाल्यास पुढील वर्षाच्या प्रारंभी लस वितरित करता येईल.
CoronaVirus News: ऑक्सफर्डची लस दर वर्षी घ्यावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 3:55 AM