इस्लामाबादः कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं असून, पाकिस्तानात लॉकडाऊनच्या काळात गरीब आणि मजुरांचा भूकबळी जात आहे. कराचीपासून काही अंतरावर असलेल्या एका भागात ४५ वर्षीय ८ महिन्यांची गर्भवती महिला रुबिना बरूही हिचा भूकबळी गेला आहे. रुबिनाचा पती अल्लाह बक्श बरुही हा लाकडापासून खेळणी बनवतो आणि रस्त्यावर विक्री करतो. त्यातूनच थोडेसे पैसे कमावून कुटुंबीयांचं उदरनिर्वाह करतात.परंतु जेव्हापासून कोरोना विषाणूचा संसर्ग पाकिस्तानात पसरला आहे आणि त्याचा प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे, तेव्हापासून गरीब मजुरांची उपासमार होत आहे. सरकारकडून रेशन वितरणाच्या कार्यक्रमाची आणि योजनांची अंमलबजावणी होत असली तरी ते अन्न-धान्य गोरगरिबांपर्यंत पोहोचत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घरातील चूल पेटलेली नाही. अशा परिस्थितीतच त्यांच्या पत्नीचा भूकबळी गेला आहे. जेव्हा ही बाब माध्यमांपर्यंत पोहोचली, तेव्हापासून या भागात लोकांची हालचाल वाढली आहे. तसेच गरीब लोकांना रेशन, दूध आणि इतर दैनंदिन गरजा सरकारकडून पुरवल्या जात आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचा रोजगार थांबला आहे. अशा परिस्थितीत लोक उपासमारीने मरत असून, सरकारच्या योजना अपुऱ्या असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तानातलं इम्रान सरकार अडचणीत सापडलं आहे.
CoronaVirus: पाकिस्तानात खेळणी विकणाऱ्या गर्भवती महिलेचा भूकबळी; इम्रान सरकार अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:47 PM
रुबिनाचा पती अल्लाह बक्श बरुही हा लाकडापासून खेळणी बनवतो आणि रस्त्यावर विक्री करतो.
ठळक मुद्देकोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं असून, पाकिस्तानात लॉकडाऊनच्या काळात गरीब आणि मजुरांचा भूकबळी जात आहे. कराचीपासून काही अंतरावर असलेल्या एका भागात ४५ वर्षीय ८ महिन्यांची गर्भवती महिला रुबिना बरूही हिचा भूकबळी गेला आहे.रुबिनाचा पती अल्लाह बक्श बरुही हा लाकडापासून खेळणी बनवतो आणि रस्त्यावर विक्री करतो.