डॉक्टर उपोषणाला बसलेत आणि म्हणत आहेत की, तसंही आम्ही मरणारच आहोत तर उपोषणनं मरू, पण निदान आमचं म्हणणं ऐका!लाहोर-पाकिस्तानचं हे चित्र आहे.एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, दुसरीकडे डॉक्टरांकडे काही साधनं नाहीत. पीपीई नाहीत. आवश्यक ती उपचार यंत्रणा नाही.ते दद्या म्हंटलं तर सरकार ऐकत नाही, गेल्याच आठवडय़ात कराचीत डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना अटक झाली, लाठीचार्ज करण्यात आला.आता पंजाब प्रांतात आणि लाहोरमध्ये डॉक्टर आणि सहायक कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.24 तासांचं उपोषण होतं, ते वाढवू असं म्हणत या डॉक्टरांनी जनतेसमोर आपली बाजू ठेवणारा एक व्हीडीओ ठेवला. जो मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला.मात्र सरकारमधल्या एका मंत्र्यानं तर असंही विधान केलं की, डॉक्टर आता अडवणूक करत आहेत, पगार वाढवून द्या म्हणून हे आंदोलन सुरु आहे, बाकी या उपोषणाला काहीच अर्थ नाही.मात्र हे सारं खोटं आहे आपण फक्त पीपीई, उत्तम साधनं, डॉक्टर आणि कर्मचा:यांसाठी सुरक्षा साधनं आणि या कोरोना लढाईत कुणी डॉक्टर दगावला ( एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला आहेच.) तर त्याला ‘शहीद’ दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे, असं यंग डॉक्टर्स असोसिएशन ही डॉक्टरांची संस्था सांगते.एकीकडे आण्विक ताकद असल्याच्या गमजा दुसरीकडे देशात डॉक्टरांची ही गत, प्राधान्यक्रम चुकला शासनाचा की काय होतं, याचं हे विदारक चित्र आहे.
coronavirus : लाहोरमध्ये डॉक्टरांचं उपोषण,त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
By meghana.dhoke | Published: April 21, 2020 4:09 PM
कोरोनाच्या लढाईत आम्हीच सुरक्षित नाही, किती काळ असं चालायचं असा डॉक्टरांचा सरकारला सवाल
ठळक मुद्देप्राधान्यक्रम चुकला शासनाचा की काय होतं, याचं हे विदारक चित्र आहे.