इस्लामाबाद : पाकिस्तानात कोरोनाने सर्व स्तरांमध्ये घुसखोरी केली असून आता खुद्द पंतप्रधान इम्रान खानच कोरोनाच्या कचाट्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध एधी फाउंडेशनचे प्रमुख फैसल एधी यांच्याकडून १ कोटींचा धनादेश स्वीकारताना केलेले हास्तांदोलन महागात पडले आहे. एधी यांना कोरोनाची लागण झाल्याने सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
फैसल एधी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर त्यांना इस्लामाबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १५ एप्रिलला एधी यांनी पंतप्रधानइम्रान खान यांची भेट घेतली होती. आतापर्यंत पाकिस्तानात ९७४९ कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून २०९ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मदत म्हणून सामाजिक कार्यकर्ते फैसल एधी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना एक चेक दिला होता. एधी यांनी कोरोना रिलीफ फंडासाठी 1 कोटी रुपयांचा चेक दिल्याचे समजते. चेक त्यांनी इम्रान खान यांच्या हातात दिला होता.
यामुळे इम्रान खान यांची कोरोना चाचणीसाठी स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. तसेच त्यांना सेल्फ आयसोलेशनमध्ये जावे लागले आहे. इम्रान खान यांच्याबरोबर एधी यांच्या संपर्कात आलेले पोलीस अधिकारी, पंतप्रधान कार्यालाचे अधिकारी, वेटर आदींचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
आणखी वाचा...
लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात
एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल
फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल
हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ