देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण येत आहे. अनेक देशांनी भारतालावैद्यकीय मदतीसाठी हात पुढे केला आहे. तर दुसरीकडे भारताचा मित्र समजल्या जाणाऱ्या इस्रायलनंही भारतासाठी वैद्यकीय मदत पोहोचवण्यास सुरूवात केली आहे. या आठवडाभरात विविध विमानांच्या सहाय्याने ही मदत भारतात येणार असून त्यासाठी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद, आरोग्य मंत्रालय, आर्थिक मंत्रालय यांच्यासोबत तेल-अवीवमधील भारतीय दूतावास आणि नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाचंही मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे.इस्रायलनं भारताला हजारो वैयक्तिक किंवा सामूहिक वापरासाठी असलेले ऑक्सिजन जनरेटर, श्वसनाला मदत करणारे रेस्पिरेटर, औषधं आणि वैद्यकीय सामुग्री पाठवण्यास सुरूवात केली आहे. "भारत हा आमच्या सगळ्यात जवळच्या आणि महत्त्वाच्या मित्रदेशांपैकी एक आहे. भारतातील संकटाच्या या प्रसंगी इस्रायल भारतासोबत असून आमच्या भारतीय बाधंवाचे प्राण वाचवणारी वैद्यकीय उपकरणे आणि अन्य प्रकारची मदत पाठवत आहे. भारत आणि इस्रायलमधील संबंध सामरिक भागीदारीच्या स्वरुपाचे असून त्यात राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे,” अशी प्रतिक्रिया इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गाबी अश्कनाझी यांनी दिली.
Coronavirus : 'संकटकाळात आम्ही मित्रासोबतच'; इस्रायलनं भारताला पाठवली वैद्यकीय मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 1:54 PM
शेकडो ऑक्सिजन जनरेटर, श्वसन यंत्र आणि भारतासाठी वैद्यकीय उपकरणे भारताकडे रवाना
ठळक मुद्देशेकडो ऑक्सिजन जनरेटर, श्वसन यंत्र आणि भारतासाठी वैद्यकीय उपकरणे भारताकडे रवानाऑक्सिजन जनरेटर, श्वसनाला मदत करणारे रेस्पिरेटर, औषधं आणि वैद्यकीय सामुग्री पाठवण्यास सुरूवात