वॉशिंग्टनः कोरोनामुळे जगभरातील विविध क्षेत्रांतील उद्योगांवर संकट आलं आहे. लॉकडाऊन असल्यानं अनेक देशांत उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे लोकांच्या नोकर्या मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्या आहेत. आता बोइंग विमान कंपनीनं 12 हजारांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकत असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतली विमान कंपनी बोईंग यांनी सांगितले की, या आठवड्यात 6,770 अमेरिकन कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त 5,520 कर्मचार्यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती अर्थात व्हीआरएसची निवड केली आहे. तसेच कंपनी पुढे आणखी लोकांना नोकरीतून काढून टाकू शकते. बोईंगच्या एकूण कर्मचार्यांची संख्या 160,000 च्या आसपास आहे. बोईंग कर्मचार्यांच्या एकूण संख्येपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. कोरोनामुळे विमान वाहतूक क्षेत्रातील ही सर्वात मोठी नोकरकपात असल्याचं मानलं जात आहे. दीर्घकालीन 737 मॅक्स संकटामुळे बोईंगचे आर्थिक गणित अक्षरशः बिघडलेले आहे. त्याचवेळी कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे आणि यामुळे कंपनीचं कंबरडे मोडलं आहे. दोन मोठ्या अपघातांनंतर 737 MAX विमानं एका वर्षापेक्षा जास्त काळापासून जमिनीवर उभी आहेत. कंपनीने 737 विमानांचे उत्पादन पुन्हा सुरू केले आहे.भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राची स्थितीकोरोनामुळे भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रावरही वाईट परिणाम झाला आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय विमानन प्रवास ट्रॅव्हल सोसायटीचा (आयएटीए) अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार कोरोनामुळे भारतीय विमान कंपन्यांना यावर्षी 1,122 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 86 हजार कोटी) तोटा होईल आणि 29 लाखांहून अधिक लोक बेरोजगार होऊ शकतात.
CoronaVirus News : कोरोनानं हवाई वाहतूक क्षेत्रावर मोठं संकट; 'ही' कंपनी देणार 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 1:45 PM