शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

CoronaVirus : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, WHOकडून भारताचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 11:35 AM

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10802591 वर पोहोचली आहे. यांपैकी, 10496308 जण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 12408 नवे रुग्ण आढळले व 15853 जण बरे झाले. तर आणखी १२० जण मरण पावले (WHO praised india)

वॉशिंग्टन/नवी दिल्ली - भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर आता जागतीक आरोग्य संघटनेनेही (WHO) भारताचे कौतुक केले आहे.  भारताने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात चांगली कामगिरी केल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेडोस ए. घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे. (WHO praised india for reducing the corona viruses)

यासंदर्भात बोलताना ट्रेडोस म्हणाले, भारताने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. यावरून आपल्याला लक्षात येते की, आपणही या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्या, तर करोना व्हायरसवर मात करू शकतो. लशीचा प्रभाव वाढल्यानंतर आपण आणखीही चागल्या परिणामांची आशा करू शकतो.

देशात कोरोना बळींची घटतेय - देशात कोरोना बाधित रुग्ण आढळत असले तरी, उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. हे प्रमाण आता 1.40 टक्क्यांवर आले आहे. या संसर्गातून 1 कोटी 4 लाख 96 हजार लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण 97.16 टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात आणखी घट होऊन तो 1.43 टक्के झाला आहे.

देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 151460 - देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10802591 वर पोहोचली आहे. यांपैकी, 10496308 जण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 12408 नवे रुग्ण आढळले व 15853 जण बरे झाले. तर आणखी १२० जण मरण पावले असून, बळींची संख्या 154813 झाली आहे. देशात 4959445 जणांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली आहे. कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 151460 एवढी आहे. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना