शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

coronavirus: हा स्प्रे कोरोनाचा कर्दनकाळ ठरणार, नाकात जाताच ९९.९९ टक्के विषाणूंचा खात्मा करणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 3:27 PM

coronavirus News : कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी विविध लसींचा वापर करण्यात येत आहे. मात्र या लसी एकूण मागणीच्या तुलनेत कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अजून एक हत्यार मानव समाजाच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली -  गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने सध्या जगातील अनेक देशांत पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी विविध लसींचा वापर करण्यात येत आहे. मात्र या लसी एकूण मागणीच्या तुलनेत कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अजून एक हत्यार मानव समाजाच्या हाती लागण्याची शक्यता आहे. ( sanotize spray will kill 99.99% of corona virus in the nose)

कॅनडामधील सॅनोटाइझ नावाच्या कंपनीने एक स्प्रे तयार केला आहे. हा स्प्रे नाकात घातल्यावर विषाणूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होते. तसेच या स्प्रेच्या मदतीने रुग्णावरील उपचारांच्या वेळेमध्येही मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. त्याशिवाय गंभीर लक्षणांचा सामना करत असलेल्या रुग्णांची स्थितीही सुधारू शकते. 

द सनच्या रिपोर्टनुसार हा स्प्रे ९९.९९ टक्के विषाणू नष्ट करतो. तसेच हा विषाणूला पसरण्यापासून रोखतो. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये झालेल्या लॅब टेस्टमध्ये सॅनोटाइझचा स्पे विषाणूला वरच्या वायूमार्गातच नष्ट करतो. त्यानंतर त्याला वाढण्यापासून आणि फुप्फुसापर्यंत जाण्यापासून रोखतो, असे दिसून आले. स्प्रेच्या माध्यमातून उपचार करून घेणाऱ्या रुग्णांमध्ये पहिल्या २४ तासांत सरासरी व्हायरल रिडक्शन १.३६२ एवढे दिसून आले. आकडेवारी पाहिल्यास या स्प्रेच्या वापरामुळे विषाणूमध्ये ९५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून आले. कर ७२ तासांमध्ये व्हायरल लोड ९९ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले.  

ब्रिटनमध्ये झालेल्या चाचणीमधील मुख्य संशोधक डॉक्टर स्टीफन विन्चेस्टर सांगतात की, मला अपेक्षा आहे की, कोरोनाच्या साथी विरोधात जागतिक लढाईमध्ये हे संशोधन हा मोठा विजय ठरणार आहे. मला वाटते ही बाब क्रांतिकारी आहे. भारतामध्येसुद्धा अशा प्रकारचे औषध विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

 कोव्हॅक्सिन विकसित करणारी भारतीय कंपनी भारत बायोटेक कोरोफ्लू या नावाने एक औषध तयार करत आहे. या औषधाचा वापर सिरींजऐवजी स्प्रेच्या स्वरूपात केला जाईल. हे औषध तयार झाल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारांची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. कारण यामध्ये कमी वेळ लागेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य