शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कोरोना धोकादायक होतोय! आता थेट मेंदूवर हल्ला करतोय; शास्त्रज्ञांकडून गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 12:24 PM

कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याची माहिती संशोधनातून समोर

लंडन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास सव्वा कोटींच्या जवळ पोहोचला आहे. यातील ७० लाख रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. मात्र आता कोरोना अधिकाधिक धोकादायक होत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.कोरोनाचा विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे श्वासोच्छवासात समस्या निर्माण होते. मात्र आता कोरोना थेट मेंदूवर हल्ला करेल, अशा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. कोरोना विषाणूमुळे मेंदूशी संबंधित विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो, अशी धोक्याची सूचना युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील (यूएलसी) संशोधकांनी दिली आहे. यूएलसीमधील संशोधकांनी ४३ कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या रुग्णांना स्ट्रोक, मेंदू आणि मज्जातंतूंच्या आजारांचा सामना करावा लागत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. कोरोनामुळे मेंदूला धोका पोहोचत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. 'कोरोनामुळे निर्माण झालेला धोका १९२० आणि १९३० च्या दशकात आलेल्या महामारीसारखा आहे का, याबद्दल संशोधन सुरू आहे,' अशी माहिती यूसीएलच्या न्युरोलॉजी विभागाच्या मायकल झंडी यांनी दिली. कोरोनाचा मेंदूवरील परिणामांचा अभ्यास करणाऱ्या पथकात झंडी यांनी उपप्रमुख म्हणून काम केलं आहे.कोरोना विषाणू फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यात अडचणी येतात. मात्र आता कोरोना मेंदूवरही परिणाम करत असल्याचं पुरावे शास्त्रज्ञांना सापडू लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. 'सध्या जगातील लाखो लोक कोरोनाबाधित आहेत. पुढील वर्षभरात हे लाखो जण बरे होतील. या व्यक्तींच्या मेंदूवर परिणाम झाल्यास त्यांच्या शारीरिक क्षमता बाधित होतील. त्यामुळे त्यांना दैनंदिन कामं करताना अडचणी येतील,' अशी माहिती कॅनडा विद्यापीठातील न्युरो शास्त्रज्ञ ऍड्रियन ओवेन यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या