कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या तीन दिवसांत १० हजारांची वाढ झाल्यानं इंग्लंडनं आजपासून जास्त नागरिकांनी एकत्र येण्यावर निर्बंध आणले आहेत. सहापेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊ नये, असा नियम सरकारनं केला आहे. त्यामुळे घरात किंवा घराबाहेर आयोजित समारंभात जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. इंग्लंड सरकारनं याबद्दलचे आदेश दिले आहेत.एकावेळी सहापेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही, असा नियम असला तरी यातून काही गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. शाळा, कार्यालयं, कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळजी घेऊन आयोजित केले जाणारे विवाह सोहळे, अंत्यविधी, क्रीडा सामने यांना निर्बंध लागू असणार नाहीत. सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झाल्यास १०० पाऊंड्सचा दंड आकारला जाईल. नियमांचा पुन्हा भंग केल्यास दंडाची रक्कम दुप्पट होत जाईल.कोरोनाच्या उद्रेकात रशिया 'या' देशाला सर्वात आधी ५ कोटी लसीचे डोस पुरवणार इंग्लंडनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीत आजपासून बदल केले आहेत. सध्याच्या घडीला कितीही सदस्य असलेली दोन कुटुंबं घरात किंवा वेगवेगळ्या घरांमधील कमाल सहा सदस्य घराबाहेर भेटू शकतात. ही संख्या ३० च्या पुढे गेल्याशिवाय पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. मात्र या नियमांत आता इंग्लंड सरकारनं बदल केला आहे.काळजी वाढली! २०२१ च्या अखेरपर्यंत आहे तशीच राहणार परिस्थिती; प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञांचा दावाइंग्लंडमध्ये आतापर्यंत ३ लाख ६८ हजार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१ हजार ६२८ जणांनी जीव गमावला आहे. एप्रिल, मेमध्ये कोरोनानं इंग्लंडमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. यानंतर जून, जुलैमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात आला. मात्र ऑगस्टपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे.
Coronavirus: ६ पेक्षा जास्त जण एकत्र नकोत; तीन दिवसांत १०,००० रुग्ण वाढले, 'या' देशाने नियम बदलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 4:41 PM