शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Coronavirus: आम्ही कोणत्याही युद्धासाठी तयार; चिनी सैन्याची अमेरिकेला थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 10:44 AM

एवढेच नाही तर चीनच्या पाणबुडी नष्ट करणा-या विमानांनी दक्षिण चीन समुद्रात आपली गस्तही वाढविली आहे.

ठळक मुद्देचीन आणि अमेरिका या जगातील दोन महाशक्तींमध्ये कोरोनामुळे तणाव वाढत आहे. चिनी सैन्य दक्षिण चीन समुद्रात आक्रमकपणे वागत असल्याचा अमेरिकेनं आरोप केला आहे.तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासन अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा चीनचा आरोप आहे.

बीजिंगः चीन आणि अमेरिका या जगातील दोन महाशक्तींमध्ये कोरोनामुळे तणाव वाढत आहे. चिनी सैन्य दक्षिण चीन समुद्रात आक्रमकपणे वागत असल्याचा अमेरिकेनं आरोप केला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासन अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा चीनचा आरोप आहे. वाढत्या ताणतणावाच्या परिस्थितीतच चिनी युद्धनौकांनी दक्षिण चिनी समुद्रात युद्धाचा सराव केला आहे. त्याचदरम्यान, अमेरिकेने अलास्कामध्ये एफ-35 लढाऊ विमानांना युद्धासाठी तयार राहण्याचे संकेत दिले आहेत. चिनी सैन्याने म्हटले आहे की, ते अमेरिकेविरोधातल्या कोणत्याही युद्धासाठी सज्ज आहेत. एवढेच नाही तर चीनच्या पाणबुडी नष्ट करणा-या विमानांनी दक्षिण चीन समुद्रात आपली गस्तही वाढविली आहे.चीनबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी मंगळवारी सांगितले की, चीनचं सैन्य दक्षिण चिनी समुद्रात आक्रमक भूमिका घेत आहे. कोरोना विषाणू पसरवल्याचा त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्याचं अभियान चालवत आहे.दक्षिण चिनी समुद्रात पीपल्स लिबरेशन आर्मीचा आक्रमक पवित्राचिनी कम्युनिस्ट पक्षाने या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपली प्रतिमा सुधारण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे, असं एस्पर यांनी पेंटागॉन येथे पत्रकार परिषदेत सांगितले. आम्ही दक्षिण चिनी समुद्रात पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी)चा आक्रमक पवित्रा सातत्याने पाहत आहोत. फिलिपिन्सच्या नौदलाच्या जहाजाला धमकावणे, व्हिएतनामची फिशिंग बोट बुडविणे आणि ऑफशोर ऑईल आणि गॅस संबंधित इतर देशांना धमकावणे, अशा पद्धतीनं चीन वागत आहे. एस्पर म्हणाले की, जागतिक महामारीमुळे बरेच देश त्यांच्या कोरोनाच्या संकटाशी झगडत आहेत. त्याचदरम्यानच्या काळात अमेरिकेचे सामरिक प्रतिस्पर्धी स्वतःच्या फायद्यासाठी संकटाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, कोरोना विषाणूबद्दल चीन सुरुवातीपासूनच पारदर्शक नव्हता. जर चीन अधिक पारदर्शक झाला असता, तर 'आम्हाला या विषाणूची  तीव्रता समजू शकली असती आणि कदाचित सध्याच्या परिस्थिती जगाला पाहावी लागली नसती. दक्षिण चिनी समुद्रात चीनचा थेट युद्धसरावअमेरिकेबरोबर युद्धाची वेळ आल्यास चीननेही आपल्या तयारीला वेग दिला आहे. चिनी विमानवाहू जहाजं, युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी थेट युद्धसराव सुरू केला आहे. चिनी सैन्याने म्हटले आहे की. ते अमेरिकेविरोधातल्या कोणत्याही युद्धासाठी सज्ज आहोत. एवढेच नाही तर चीनच्या पाणबुडी नष्ट करणा-या विमानांनी दक्षिण चीन समुद्रात आपली गस्तही वाढविली आहे. अमेरिका या भागात सतत आपले सैन्य जहाज पाठवत असताना चीनने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे पाळत ठेवणारी विमानेही या भागास नियमित भेट देत आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: जगाची भारताकडे नजर; बुद्धांनी सांगितलेल्या चार मार्गांवरून देशाची वाटचाल- नरेंद्र मोदी

Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या

CoronaVirus News: कोरोनाची लस जगाला देणार का?; भारताचा उल्लेख करुन इस्रायलचं लय भारी उत्तर

पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट; शेतकऱ्यांना सतावतेय चिंता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन