शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
2
११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
4
खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...
5
IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता
6
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
7
वडिलांकडून पैसे घेतले उधार, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी
8
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
9
डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस
10
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
11
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
12
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
13
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
14
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
15
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
16
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
17
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
18
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
19
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?

CoronaVirus News: कोरोनाला रोखून दाखवलं! 'या' देशात २०० दिवसांत एकाही रुग्णाची नोंद नाही

By कुणाल गवाणकर | Published: October 30, 2020 12:10 PM

CoronaVirus News: देशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ५५३ रुग्ण आढळले; सात जणांचा मृत्यू

तैपेई: भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे. दिवसभरात आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या तीन आठवड्यांपासून घसरत आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांच्या खाली आली आहे. मात्र युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच फ्रान्स आणि जर्मनीमधील परिस्थिती बिघडली आहे. दोन्ही देशांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अमेरिकेतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

जगातील बडे देश कोरोना संकटामुळे हैराण झालेले असताना तैवाननं मात्र कोरोनावर विजय मिळवला आहे. तैवानमध्ये गेल्या २०० दिवसांत एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. तैवानमध्ये १२ एप्रिलला कोरोनाचा शेवटचा रुग्ण सापडला. त्यानंतर देशात एकाही कोरोना रुग्णाची नोंद झालेला नाही. त्यामुळे भल्याभल्या देशांना न जमलेली कामगिरी तैवाननं करून दाखवली आहे. 
तैवानची लोकसंख्या सव्वा दोन कोटी इतकी आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण ५५३ रुग्ण आढळून आले. तर सात जणांचा मृत्यू झाला. आसपासच्या देशांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येताच तैवाननं तातडीनं प्रवासावर निर्बंध लादले. त्याचा परिणाम लगेचच दिसला. यासोबतच देशात मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आलं. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी चाचण्या सुरू करण्यात आल्या. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीनं उपचार सुरू झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्वरित शोधून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.कोरोनाला रोखणाऱ्या तैवानची जगभरातून दखल घेतली गेली आहे. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी तैवानचं कौतुक केलं आहे. अमेरिकेतील खासदार बर्नी सँडर्स यांनी ट्विट करून तैवानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 'त्यांनी हे कसं काय केलं? त्यांनी विज्ञानावर विश्वास ठेवला,' असं सँडर्स यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या