नवी दिल्ली : चीनचा शेजारील देश असूनही कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने तैवानचे जगभर कौतुक होत आहे. तेथे कोरोनाचे केवळ ४४० रुग्ण आढळले आहेत तर ७ जणांचा यात बळी गेला आहे. चीनला धोबीपछाड देत तैवानला आता जागतिक आरोग्य संघटनेत निरीक्षक म्हणून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे.तैवानच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांना वाटत आहे की, हा देश जागतिक आरोग्य संघटनेत असावा. परंतु चीनचा याला विरोध आहे. चीनने अनेकदा तैवानच्या भूभागावर आपला हक्क सांगितला आहे. भारत आजवर या मुद्द्यांवर चीनला साथ देत आला आहे. परंतु आज जर भारताने तैवानला जागतिक आरोग्य संघटनेत निरीक्षक म्हणून घेता यावे या बाजूने मतदान केले तर भारताला चीनला तैवानविरोधात साथ देण्याच्या धोरणापासून फारकत घ्यावी लागेल.
coronavirus: चीनला धोबीपछाड देऊन तैवान आरोग्य संघटनेमध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:54 AM