वॉश्गिंटन – संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचं संकट उभं राहिलं असताना यातून अमेरिकेसारखा बलाढ्य देशही सुटला नाही. अमेरिकेत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे देशातील आर्थिक व्यवस्थेला नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांच्या हितासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेण्यासाठी पावलं उचललं आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही परदेशी व्यक्तीला अमेरिकेत स्थायिक होण्यास बंदी घातली जाणार आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. न दिसणाऱ्या शत्रूच्या हल्ल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पाहता आमच्या अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या वाचवणं गरजेचे आहे. त्यासाठी एका आदेशावर मी स्वाक्षरी करणार आहे. ज्या अमेरिकेत बाहेर येणाऱ्या नागरिकांना स्थायिक होण्यास बंदी घातली जाणार आहे.
अमेरिकेच्या या निर्णयामुळे स्पष्ट झालं आहे की, पुढील आदेशापर्यंत आता कोणताही परदेशी नागरिक अमेरिकेचा नागरिक होऊ शकणार नाही आणि यासाठी अर्जही करु शकणार नाही. नोकरी आणि व्यवसायासाठी जगभरातील लोक अमेरिकेत जातात, जे काही काळानंतर तेथे नागरिकत्वासाठी अर्ज करतात. लॅटिन अमेरिका, युरोपमधील मोठ्या संख्येने लोक अमेरिकेत जातात. याखेरीज भारतासह इतर आशियाई देशांतून जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कोणत्याही प्रकारच्या स्थलांतरणावर बंदी घातली आहे, पण ही बंदी तात्पुरत्या स्वरुपात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिका आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या दोन महिन्यांत अमेरिकेतील १ कोटीहून अधिक लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत आणि बेरोजगारांना उपलब्ध सुविधांसाठी अर्ज केले आहेत. याशिवाय अमेरिकन व्यवसायावर मोठे संकट निर्माण झाले आहे, म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांना हा निर्णय घेण्यास भाग पडलं असल्याचं जाणकारांचे मत आहे.
अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. या प्राणघातक विषाणूमुळे अमेरिकेत ४२ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे आठ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासात १ हजार ४३३ लोक मरण पावले आहेत जो एका दिवसातील सर्वाधिक मृतांचा आकडा आहे.
चीनमध्ये 'ऑपरेशन लोटस'; कोरोनाच्या धक्क्यानंतर जगाला आश्चर्यचकित करण्याचे मनसुबे
किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका
'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या