शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

Coronavirus:…तर पाकिस्तानी लोक उपाशी मरतील; इम्रान खान यांना सतावतेय वेगळीच भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:20 PM

पाकिस्तानमध्ये क्रिकेट स्टेडियम, शाळा, कॉलेज, यूनिवर्सिटी बंद करण्यात आल्या आहेत. अन्य देशांपेक्षा पाकिस्तानला कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. कारण या देशाच्या सीमा खुल्या आहेत. कोणीही आत-बाहेर करू शकते.

इस्लामाबाद : दहशतवाद्यांना पोसण्यासाठी हजारो कोटी रुपये उधळणाऱ्या पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे. ही कोंडी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर कोरोना व्हायरसने केली आहे. जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी बाजारपेठा, शाळा, मॉल, हॉटेल बंद ठेवण्यात येत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तसे करू शकत नसल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आलेली आहे. एवढी की पाकिस्तानी पंतप्रधानाला सामान्य प्रवाशांप्रमाणे प्रवासी विमानातून परदेश दौरे करावे लागत आहेत. सरकारी वाहने विकावी लागत आहेत. विकासासाठी, दहशतवादाविरोधात आलेला निधी या देशाने भारताविरोधात दहशतवाद्यांची निर्मिती आणि त्यांचे पालन पोषण करण्यासाठी वापरल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पाकिस्तानी लोकांचे रोजचे जेवणाचे वांदे झालेले असतानाही पाकिस्तान कोरोनाच्या आशियाई देशांच्या बैठकीत काश्मीरबरच बोलत होते.

आता त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वेगळीच भीती व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये आजपर्यंत २३७ रुग्ण आढळले आहेत. हा कोरोनाच पाकिस्तानचे उरले सुरलेले कंबरडे मोडणार आहे.

पाश्चिमात्य देशांसारखे शट डाऊन पाकिस्तान करू सकत नाही. शहरे मोठ्या प्रमाणावर बंद करण्याची जोखिम आम्ही घेऊ शकत नाही. येथील परिस्थिती अमेरिका, युरोप सारखी नाहीय. येथे २५ टक्के लोक दारिद्र्यरेषेखालील आहेत. जर शहरे बंद केली तर या लोकांना कोरोनापासून तर वाचवू शकू पण ते उपाशी मरतील, अशी भीती इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानमध्ये क्रिकेट स्टेडियम, शाळा, कॉलेज, यूनिवर्सिटी बंद करण्यात आल्या आहेत. अन्य देशांपेक्षा पाकिस्तानला कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. कारण या देशाच्या सीमा खुल्या आहेत. कोणीही आत-बाहेर करू शकते. तसेच येथील हॉस्पिटलची अवस्थाही केविलवाणी आहे. हात जोडण्यापेक्षा गळाभेट घेण्यात येथील जनतेला चांगले वाटते. लाखोंच्या संख्येने लोक अशिक्षित आहेत. तसेच देशाची आर्थिक स्थितीही चांगली नाही. या साऱ्यामध्ये अडकल्याने गर्दीची ठिकाणे बंद करण्यात येणार नाहीत.

पाकिस्‍तानातील सिंध प्रांत हा कोरोनाचा गड बनत चालला आहे. येथे सर्वाधिक २३७ जमांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय खैबर पख्‍तूनख्‍वामध्ये 15, बलुचिस्‍तानमध्ये 10, पंजाबमध्ये 2, राजधानी इस्‍लामाबादमध्ये 2, तर गिलगिट-बाल्टिस्‍तानमध्ये कोरोचाचे 5 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्‍तानात गेल्या 24 तासांत कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या तीनपट वाढली आहे. यातील तब्बल 115 रुग्ण एकट्या सिंध प्रांतात आढळले आहेत.

 

चीनसमोर पाकिस्तानने पसरले हात -कोरानाचे संकट ओढवल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्‍ट्रपती आरिफ अल्‍वी यांना चीनकडे मदतीसाठी पाठवले आहे. चीनवर कोरोनासंकट ओढवल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाचे राष्ट्रपती चीन दौऱ्यावर गेले आहेत. एवढेच नाही, तर राष्‍ट्रपति अल्‍वी यांचाही हा पहिलाच चीन दौरा आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानcorona virusकोरोना वायरस बातम्याImran Khanइम्रान खान