वॉश्गिंटन – चीनपेक्षाही कोरोनाचा प्रार्दुभाव अमेरिकेत जास्त झाला आहे. दिड लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. जर लोकांनी सोशल डिस्टेंसिंगचं पालन नाही केलं तर देशात २२ लाख लोकांचा मृत्यू होईल अशी भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. मृतांचा आकडा १ लाखपर्यंत रोखला तर आम्ही चांगले काम केलं असं वाटेल असं ट्रम्प म्हणाले.
३० एप्रिलपर्यंत लोकांनी गर्दी करु नये, सोशल डिस्टेंसिंग राखावा तरच १ जूनपर्यंत पूर्णपणे कोरोनामुक्त होऊ शकतो. डॉक्टरांनीही सांगितले की, जर लोकांवर कडक बंधन आणलं नाही तर २ लाखांपर्यंत मृतांचा आकडा पोहचू शकतो. न्यूयॉर्कमध्ये हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तावर उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टर ठाकूर यांनी अमेरिकेत परिस्थिती भयानक असल्याचं सांगितले.
हॉस्पिटलच्या बाहेर ट्रक उभा असतो, कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह थेट कब्रिस्तानात पाठवला जातो. मी १२ वर्षापासून न्यूयॉर्क येथील हॉस्पिटलमध्ये फिजीशियन म्हणून काम करते. जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण आला त्यावेळी इतकी गंभीर परिस्थिती होईल याचा विचारही केला नाही. आता रुग्णालयाबाहेर कोरोनाग्रस्तांची रांग लागली आहे. फक्त न्यूयॉर्कमध्येच १ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ भारतीयदेखील आहे. ई-सिगरेटमुळे युवांमध्ये याचे संक्रमण लवकर पसरत असल्याचं डॉक्टर ठाकूर यांनी सांगितले.
तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी ६ हजार बेड आहेत. याठिकाणचा मृतांचा आकडा सांगू शकत नाही. पण बिकट अवस्था आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या इतकी आहे की उपचारासाठी मिळणारं साहित्य ८ दिवसांच्या अंतराने मिळतं. मी आणि माझे सहकारी डॉक्टरही किती दिवस झाले एकच मास्क घालत आहोत. सलग २० दिवस काम केल्यानंतर एक दिवसाची सुट्टी मिळते. माझ्या टीममध्ये २५ लोक होते त्यातील २२ जणांना कोरोनाची लागण झाली आता आम्ही ३ जण वाचलो आहे. सुट्टी मिळाली तरी घरात पती आणि मुलांपासून दूर राहते असा अनुभव डॉक्टर ठाकूर यांनी सांगितला.
महत्त्वाच्या बातम्या
अमेरिकेतील लॉकडाऊन आणखी महिनाभर वाढविला; ट्रम्प यांचा निर्णय
उत्तर कोरियाचे बिंग फुटले, किम जोंग गुपचूप करतोय हे काम
...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय?; शिवसेनेने घेतला समाचार
भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली; विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर...
...म्हणून पाक पंतप्रधान इमरान खान यांनी केला नरेंद्र मोदींचा उल्लेख; लॉकडाऊनचा विरोध