वॉशिंग्टन - चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावाचा सर्वाधिक फटका अमेरिकाले बसला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावासाठी अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरुवातीपासूनच चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. अखेर आज अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला मोठा दणका दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका भरीव मदत करत असतानाही ही संघटना चीनच्या कलाने काम करत असल्याचा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले संबंध तोडण्याची घोषणा केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले अमेरिकेचे संबंध संपवण्याची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणले की, दरवर्षी केवळ ४ कोटी डॉलर एवढी रक्कम मदत म्हणून देणाऱ्या चीनने जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. दुसरीकडे अमेरिका मात्र या संघटनेला दरवर्षी ४५ कोटी डॉलरची मदत देत आली आहे. जागतिक आरोग्य संघटना योग्य त्या सुधारणा करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे आजपासून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले संबंध तोडत आहोत, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.
दरम्यान, सध्या अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येत असलेला निधी हा आता जगातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य संघटनांना देण्यात येईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले. तसेच कोरोनामुळे जगभरात होत असलेल्या मृत्यूंसाठी जागतिक आरोग्य संघटना आणि चीन जबाबदार असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
कोरोना विषाणू हा वुहान विषाणू असल्याचाही ट्रम्प यांनी यावेळी पुनरुच्चार केला. चीनने वुहान विषाणूला लपवून कोरोनाला जगभर पसरू दिले. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाने जागतिक महामारीचे रूप घेतले. त्यात एक लाखांहून अधिक अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच जगातही लाखो लोक मृत्यूमुखी पडले, असा आरोप ट्रम्प यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...
शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी